Vitthal Aarti In Marathi | श्री विठ्ठलाची आरती

युगे अठ्ठाविस विटेवरी उभा ।

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।

पुंडलीकाचे भेटी परब्रम्ह आले गा ॥

चरणी वाहे भीमा उध्दरी जगा ॥१ ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा ।। जय ॥ धृ ॥

तुळसीमाळ गळा कर ठेवुनि कटी ।

कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी देव सुरवर नित्य येती भेटी ॥

गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥ जय देव ॥

धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ॥

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा, राई-रखुमाबाई राणीया सकळा ।।

ओवाळीती राजा विठोबा सावळा ॥ जय देव ॥

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ॥

चंद्रभागेमाजी सोडूनिया देती, दिंड्या पताका वैष्णव नाचती ।।

पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ जय देव ||

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ॥

चंद्रभागेमाजी स्नानं जे करिती, दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती ॥

केशवासी नामदेव भावे ओवाळती ॥ जय देव ॥

श्री संत बाळूमामा आरती

CNG vs Petrol: Key Differences Marathi /English Information 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top