Shri Sant Balu mama Aarti | श्री संत बाळूमामा आरती
जयदेव जयदेव जय बाळूमामा ।
आरती ओवाळू तुज कैवल्य धामा ||
धनगर कुलाचा उद्धार झाला ।
अवतरले संत अकोळ गावाला ।
बालपणी त्यानी चमत्कार केला ।
वस्तीचे दर्शन भोजन थाळीला ॥ १ ॥
जयदेव जयदेव जय बाळूमामा ।
मेंढ्या राखिती उन्हातानात ।
मुक्या प्राण्यावर अपार प्रीत।
नीतीने बागावे कमी नाही होत।
उन्मत्ताला मामा शासन करीत || २ ||
जयदेव जयदेव जय बाळूमामा ।
गोसावी रूपात देवदूत आले।
मामांचे त्यांनी सत्व पाहिले ।
अवघड विहीरीचे पाणी पाजता ।
आशीर्वाद देवी प्रसन्न होता || ३ ||
जयदेव जयदेव जय बाळूमामा ।
दीन दुबळ्यांना मामा राक्षिती।
निपुत्रिकाला मामा संतान देती ।
कण्या रोगाल्या औषधी होती ।
भंडा-याचा महिमा वर्णावा किती ॥ ४ ॥
जयदेव जयदेव जय बाळूमामा ।
पृथ्वीतलावर मामांची सत्ता ।
देती वचन आपुल्या भक्ता ।
आदमापूर क्षेत्री समाधी घेता ।
स्वप्नी दर्शन भक्तांना देता ॥ ५ ॥
जयदेव जयदेव जय बाळूमामा ।