शूर आम्ही सरदार | Shoor Amhi Sardar
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती
देव देश अन् धर्मापायीं प्राण घेतलं हातीं ।॥ध्रु ।।
आईच्या गर्बात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशीं लगीन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती
देव देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हातीं ।॥१ ॥
जिंकावें वा कटून मरावं हेंच आम्हाला ठावं
लढून मरावं मरुन जगावं हेंच आम्हाला ठावं
देशापायी सारी इसरुं माया ममता नाती
देव देश अन् धर्मापायीं प्राण घेतलं हाती ॥२॥