श्री संतोषीमातेची आरती Santoshi Mata Aarti
श्री संतोषीमातेची आरती
जय देवी श्री देवी संतोषी माते ।
वंदन भावें माझें तव पदकमलातें ॥ धृ ॥
श्रीलक्ष्मीदेवी तूं श्रीविष्णूपत्नी
पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नीं ।।
जननी विश्वाची तूं जीवन चिच्छक्ती
शरण तुला मी आलों नुरवी आपत्ती ।। १ ।।
भृगुवारी श्रद्धेनें उपास तव करिती ।
आंबट कोणी काही अन्न न सेवीती ।।
गूळ चण्याचा साधा प्रसाद भक्षीती ।
मंगल व्हावे म्हणुनि कथा श्रवण करिती ॥ २॥
जे कोणी नरनारी व्रत तव आचरिती
अनन्य भावें तुजला स्मरुनी प्रार्थीती ।।
त्याच्या हांकला तूं धांदुनिया येअसी ।
संतति वैभव कीर्ती धनदौलत देसी ॥३॥
विश्वाधारे माते प्रसन्न तू व्हावें ।
भवभय हरुनी आम्हां सदैव रक्षावें ।।
मनींची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी म्हणुनी मिलिंदमाधव आरती ओवाळी ।।४।।
श्री संतोषीमातेची आरती समाप्त.