Tukaram Maharaj |संत तुकाराम महाराज अभंग गाथा १ ते १०० |Sant Tukaram Maharaj Abhang

संत तुकाराम महाराज अभंग गाथा १ ते १००

अभंग गाथा, संत तुकाराम महाराज  सार्थ तुकाराम गाथा

अभंग क्र.१ Tukaram Maharaj Abhang

अर्थ:-

हे हरी तुमचे चरण विटेवर सम आहेत तुमची दृष्टीही सम आहे आणि अशा तुमच्या साजर्‍या रूपावर माझी वृत्ती स्थिर राहो.आणि देवा या व्यतिरिक्त मला कोणतेही माइक पदार्थ म्हणजे मायेने व्यापलेले पदार्थ नको व त्या ठिकाणी माझी तृष्णा इच्छा देखील राहू देऊ नका.हे देवा ब्रह्मादिक पदे व या सारखे पदे उच्च ठिकाणी माझे मन जडू देऊ नको कारण ते पद म्हणजे एक प्रकारची दुःखाची शीराणीचा आहे.तुकाराम महाराज म्हणतात देवा जे जे काही कर्म धर्म आहे त्याचे वर्म आता आम्हाला समजले आहे ते म्हणजे असे की हे सर्वकाही नाशिवंत आहे

अभंग क्र.२ Tukaram Maharaj Abhang

अर्थ:- Tukaram Maharaj Abhang

 देवाने गोड स्वर दिला नसला, मला गोड गळ्याने तुझे स्वर गाता येत नसले तरी काही हरकत नाही.विठ्ठल त्या वाचून भूकेला नाही जसा जमेल तसा “राम कृष्ण” हा मंत्र जप .श्रद्धेने, निष्ठेच्या बळाने व प्रेमाने देवाची भक्तिपूर्ण आळवनि कर .तुकाराम महाराज म्हणतात हे मना तुला मी सांगतो ते तू ऐक की हरी विषयी तू दृढ निर्धार धर.

अभंग क्र.३

अर्थ:- Tukaram Maharaj Abhang

तुकाराम महाराज दोन वेळा सवध झालो असे म्हणून हरिच्या जागराला आलो असे म्हणतात.तेथे आता वैष्णवांची गर्दी झाली असून, हरी भजनांची गर्जना होत आहे .नाम साधनेच्या आड येणारी पापरूपी झोप आता उडून गेली आहे.तुकाराम महाराज म्हणतात की त्या ठिकाणी हरीकृपेचा ओलाव व छाया आहे .

अभंग क्र.४

अर्थ:- Tukaram Maharaj Abhang

ज्याला आपल्या हिताची चिंता असते, ज्याला आपले हित कळते त्याचे माय बाप धन्य आहेत.ज्या कुळामधे सात्विक वृत्तीची मूली – मुले जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वरालादेखिल हरिख वाटतो .अशी सात्विक वृत्तीची मुले गीता-भागवत श्रवण करतात, विठ्ठलाचे अखंड चिंतन करतात .तुकाराम महाराज म्हणतात अश्या लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्या सारखा भाग्यवान मीच ठरेल .

अभंग क्र.५

अर्थ:- Tukaram Maharaj Abhang

परमेश्वर भक्ताच्या अतःकरणातील भक्तिचि गोडी स्विकारतो आणि त्याच्या अतःकरणातील भाव पाहतो .देव भक्ताचा सोयरा झालेला असतो असे महाराज तीन वेळा म्हणतात.आपुल्या जवळ जे वैभव आहे मग ते कसे का असेना पण ते वैभवाच निर्मळमानाने देव समजावे.तुकाराम महाराज म्हणतात तो हरी भक्तांबरोबर भोजन करतो व त्याच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करावा .

अभंग क्र.६

अर्थ:-

हे देवा अरे तुझे आम्हाला जे हवे आहे ते आम्हाला सर्व पावले आहे आता दुसरी भावना आमच्या मना मध्ये तू येऊ देऊ नकोस.अरे विठ्ठला मी जिथे तिथे पाहतो तेथे तुझीच पाऊले दिसतात आणि त्रिभुवनात तूच संचार केला आहे.देवा भेद आणि अभेद वाद आणि संवाद हि सर्व भ्रम आहेत आम्हाला त्याच्याशी वाद विवाद होईल असे होऊ देऊ नकोस.तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यात छोटा असा अणु त्या मध्येही तू आहेस आणि जर पहिले तू तर नाभाहूनही मोठा आहेस.

अभंग क्र.७

अर्थ:- Tukaram Maharaj Abhang

एक भोगवादी स्त्री हि नवऱ्याला म्हणते खरे तर ती सुखी असते पण ती सोंग आणते आणि म्हणते तुम्ही माझे काही दुःख पाहत नाही मग तो पती तिच्या आवडीने वेडा झाल्या मुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो.ती स्त्री त्या नवऱ्याला म्हणते मला अखंड पोटाची व्यथा आहे त्यामुळे त्याला पथ्य म्हणजे दुध तूप साखर घालून भात खावा लागेल.आहो मला दुसऱ्या प्रहराला चक्कर येते आणि मी बेशुध्द पडते मला शुध्द राहत नाहीव त्या मुळे मला झोप लागत नाही.मला माझ्या खाली फुले टाकल्यावर झोप येते व हि माझी मुले माझ्या जवळ असल्यावर किरकिर करतात त्यामुळे ते मला सहन होत नाही.नाटक करत ती त्याला म्हणते कि मला कपाळ शूळ आहे त्यामुळे मी अंगाला व कपाळाला चंदन लावते.साधे अन्न मला जमत नाही मला तीन पायली गव्हाचा सांजा लागतो.गेल्या आठवड्या मध्ये तुम्ही जी साडे दहा शेर साखर आणली ती सातच दिवस गेली.आहो माझे हाडे बारीक होऊन माझे मांस वाढले केव्हढे माझे हे दुख आहे हे तुम्हाला कळत कसे नाहीतुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारे त्या माणसाचा जिवंत पणे गाढव केला आणि मेल्यावर तो नरकाला गेला.

अभंग क्र.८

अर्थ:- Tukaram Maharaj Abhang

जे संत पुढे गेले त्यांची चरणवंदना करुण, त्यांचे उष्टे सेवन करू; त्यामुळे आपल्या पूर्व कर्मचि होळी होईल .हे ज्ञानभक्तिचे भांडवल पदरी बांधून, विठ्ठलास वश करुण घेऊ .गोविंदाचे केवळ नामस्मरणान व् चिंतनाने जीवनातील सर्व लाभ प्राप्त होतील .जन्ममृत्युच्या येरझार्‍या संपतील आणि संत सहवासाने हा जन्म सार्थकी लागेल .पुढे गेलेल्या संतसजनांच्या मार्गाने शोध करीत त्यांच्या मार्गाने आपण त्यांचा माग घेत पुढे जाऊ .तुकाराम महाराज म्हणतात की, या मार्गाने गेले असता मोक्षरुपी माहेराचा लाभ होईल .

अभंग क्र.९

अर्थ:- Tukaram Maharaj Abhang

संतसज्जनांच्या ज्ञानरूपी उष्ट्या भोजनाची मी अपेक्षा करतो आहे .मी सोवळे-ओवळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे .ब्रम्हरूपाचे तत्वज्ञान मला इतरांनी संगावयाचे कारण नाही; कारण प्रत्यक्ष भगवंताने मला ते सांगितले आहे .आमच्यामध्ये द्वैतभाव नाही म्हणून प्रत्येक्ष भगवंत आमच्या पाठीमागे उभा आहे .मी संतांच्या उच्छिष्टाच्या भोजनाची इच्छा बाळगत आहे.म्हणुन कोणीहि मनामधे शंका धरु नये .तुकाराम महाराज म्हणतात की, प्रत्यक्ष भगवंतनेच लालचवलेल्या माझ्या मनाची ही इच्छा पूर्ण केली आहे .

अभंग क्र.१०

अर्थ:- Tukaram Maharaj Abhang

संतसज्जनांच्या उच्छिष्टाच्या सेवनाने तुम्ही या अध्यात्ममार्गातील अधिकारी व्हाल .देवादिकांनाही न मिळणार हे उच्छिष्ट कनिष्ट मानु नका .सर्वांना पुरुन उरेल इतका ज्ञानरस ईथे भरला आहे, त्याचा सेवन करण्याचा अधिकार येथे सर्वांना आहे .जो जो मनुष्य इथे जी जी इच्छा करेल ती पूरविणारा इच्छादानी विठ्ठल येथे सर्वांची नमोकामना पूर्ण करीत आहे .या प्रसादाच्या सेवनात जो आनंद मिळतो तो चिरंतन टिकणारा आहे, त्याचे सेवन करण्याची इच्छा वारंवार होते . तुकाराम महाराज म्हणतात हे भोजन प्रत्यक्ष लक्ष्मी तयार करते तिच्याच हातून या भोजनाचा लाभ व्हावा.

अभंग क्र.११

अर्थ:- Tukaram Maharaj Abhang

जगामद्धे अवगुणी लोकांची नेहमी फजीति होत असते .धातुचे भांडे चांगले की वाइट हे पहण्यापेक्षा त्यातील रस प्राशन करण्यास योग्य की अयोग्य हे प्रथम पहावे .विष तांब्याच्या वाटित जरी भरले तरी त्याचे सेवन करने हे अयोग्य आहे . तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे मनातील परमेश्वरा विषयीचा शुद्ध भाव महत्वाचा आहे, त्याचे सोंग घेऊ नये असे .

अभंग क्र.१२

अर्थ:- Tukaram Maharaj Abhang

हरिचे नामस्मरण करने, भक्ति करने हे तुझ्या मनात का बरे येत नाही .या संसारामधे तुझे जीवन व्यर्थ जात आहे, ती तूट भरून निघणार नाही .ज्यांच्यासाठी तू आपले आयूष्य व्यर्थ घालवित आहे, ते तुला शेवट पर्यंत साथ देणार नाहीत.तुकाराम महाराज म्हणतात , की तू आपल्या जीवनाचे सार्थक कश्यामध्ये आहे याचा विचार कर .

अभंग क्र.१३

अर्थ:- Tukaram Maharaj Abhang

हे परमेश्वरा, तू प्रत्यक्ष धर्माची मूर्ति आहेस, पाप-पूण्य घडवुन आणणे हे सर्वस्व तुमच्या हाती आहे .

या प्रपंच्यातील कर्मापासून माझी सोडवणुक करा .हे परमेश्वरा, माझा स्वीकार केल्याने तुम्हाला माझा भार होईल काय तुकाराम महाराज म्हणतात जीवाचे जीवन असलेल्या नारायणा मी तुला विनंती करीत आहे .

अभंग क्र.१४

अर्थ:- Tukaram Maharaj Abhang

अतिशय सुंदर असे विठ्ठलाचे ध्यान, कमरेवर हात ठेऊन विटेवर उभे आहे .त्याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे पीतांबर नसलेला आहे असे हे विठ्ठालाचे रूप मला नेहमीच आवडते .मसोळीच्या आकारची कुंडले त्याच्या कानात झळकत आहेत गळ्यात कौस्तुभमणी धारण केलेला आहे .तुकाराम महाराज म्हणतात की, हे ध्यान माझे सर्वसुख आहे असे सुशोभित ध्यान मी नेहमी आवडिने पाहीन.

अभंग क्र.१५

अर्थ:- Tukaram Maharaj Abhang

हे माझ्या सोयरिया रखुमाईच्या पती माझे डोळे नित्य तुझ्या मूर्तीवर जडलेले असो अरे तुझे नाम व रूप इतके गोड आहे कि ते मला सदा सर्व काळ प्रेम देते व तू मला नित्य प्रेम दे.हे विठू माऊली मला हाच वर दे कि तू माझ्या हृदया मध्ये संचारून राहशील.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी तुला दुसरे काही मागत नाही तुझ्या पायाशीच सर्व सुख आहे.

अभंग क्र.१६

अर्थ:- Tukaram Maharaj Abhang

राजस, सुकुमार असा हा विठ्ठल म्हणजे जणू मदनाचा पुतुळा आहे सूर्य-चंद्राच्या प्रभा त्याच्या तेज्यात लपल्या आहे .त्याच्या कपाळि कस्तूरिचा मळवट भरला असून अंगावर चंदनाची ऊटी लावलेली आहे गळ्यात वैजयंती माळा रूळत आहे .मस्तकावर मुकुट व कानात कुंडले असलेले सुंदर रूप म्हणजे जणू सर्व सुखाचे आगर आहे .त्याने कमरेला जरीकाठी पितांबर नेसले आहे व् भरजरि शेला पांघरला आहे बायानो असा हा विठुराया सवळया रंगाचा आहे .तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही सर्व बयांनी एका बाजुला व्हा मझ्या आड येउ नका, श्रीमुख पहिल्याखेरीज माझ्या मनाला समाधान लागत नाही .

अभंग क्र.१७

अर्थ:- Tukaram Maharaj Abhang

विठुराया कमरेवर हात ठेऊन, गळ्यात तुळशिमाळा धारण करून उभा आहे, हे हरी असे रूप मला वारंवार दाखव .दोन्ही पाय विटेवर ठेवलेले असे तुझे रूप माझ्या डोळ्यांना दाखवावे .कमरेला पितांबर कास शोभून दिसते आहे असे रूप मला दाखव .गरुड पारावार उभे असलेले तुझे रूप मला नेहमी अठवते .या गोड सरूपाच्या आठवानीने माझे शरिर अस्थिपंजर बनु लागले आहे तेव्हा हे पंढरी राया, मला भेटायला ये .तुकाराम महाराज म्हणतात, की माझी एवढी आस पूर्ण करावी माझ्या प्राथनेचा अव्हेर करू नये.

अभंग क्र.१८

अर्थ:- Tukaram Maharaj Abhang

गरुडरूपी अश्वावर आरूढ झालेले, कमरेला पीतांबर नसलेले, मोहक असे हे सावळे सुंदर रूप मी केव्हा पाहीन उत्तमात उत्तम असे मेघासारखे श्यामल हे रूप आहे गळ्यात वैजयंती माळा शोभत आहे .त्याने मस्तकावर कोटि सूर्‍याच्या तेज्याप्रमाणे झळकणारा मुकुट घातला आहे, गळ्यात कौस्तुभमणी शोभुन दिसत आहे.सर्व सुखांनी युक्त असे हे सुंदर रूप असून, त्याच्या डाव्या बाजूला अतिशय सुंदर अशी रखुमाई आहे .त्याच्या दोन्ही बाजूस उद्धव व अक्रूर ‍हे उभे आहेत सनकादिक त्याच्या किर्तीचे गुणगान करत आहेत .तुकाराम महाराज म्हणतात, जो इतर कोणासारखाहि नाही ऐसा ईश्वर माझा सखा पांडुरंग आहे .

अभंग क्र.१९

अर्थ:-

ब्रम्हादिक देवसुद्धा ज्या भक्तिप्रेमाच्या लाभाला पारखे झाले, तो लाभ आम्हाला मिळाला आहे आम्ही परमेश्वराला शरणागत आम्ही आहोत, म्हणून बलवान आहोत .आम्ही विषय वासनेचा त्याग केल्यामुळे या भजनांचा लाभ आम्हाला झाला आहे आमच्या भक्ति मुळे हा परमेश्वर आमचा ऋणी झाला आहे .कामधेनुच्या दुधला अंत नाही, याचकाच्या मर्जी प्रमाणे ती त्याला दुग्धपान देत असते, तसा परमेश्वर भक्ताच्या इच्छेला मान देत असतो .परमेश्वरप्रेमाचे असे भरते आमच्या मनामधे निर्माण झाले आहे ,की त्यामुळे त्रिपुटिंचाहि भेद करता येतो .आमच्या ठिकाणी परमेश्वराचा वास आसल्यामुळे आम्हाला हार मनण्याची माहित नाही; कारण आम्ही विष्णुदास आहोत .या भक्तिप्रेमाच्या भोजनामुळे विचारी मनुष्य उपवाशी राहत नाही अविचारी मनुष्य भक्तिप्रेमाला मुकला आहे .

अभंग क्र.२०

अर्थ:-

ज्ञान मिळाल्यामुळे द्वैतभावनेचा निरास होतो, सर्वत्र परमेश्वराचा संचार आहे , हे ध्यानात येते; त्यामुळे आपल्यामधील आत्माराम ओळखता येतो .हे रहस्य जाणून घेण्यासाठी या आत्मारामची ओळख पटउन घेतली पाहिजे ज्या प्रमाणे परध्याची कला पारध्यालाच अवगत असते, तसे विष्णुदासाचे मन परमेश्वराला जाणून त्याच्याशी एकरूप होते .विषयवासनेमधे गुंतलेला हा देह खरा आहे का हे समजल्यावर देहासंमंधीचा पसारा खारा की खोटा हे लक्ष्यात येते जसे शेतीतिल बुजगावने चोराला पिकाचे रक्षण करणारे वाटते, तसा भ्रम मनुष्याच्या मनात देहाविषयी निर्माण होतो .तुकाराम महाराज म्हणतात, हे जीवा, जागा हो आणि तुझ्यामधील आत्मारामाला ओळख पटउन घे; कारण तूच परमेश्वरस्वरूप आहेस .

अभंग क्र.२१

अर्थ:-

हे जग विष्णुमय आहे, वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे, माणसामाणसांमध्ये भेद करने ही अमंगल बाब आहे .हे भक्तजनहो, तुम्ही भगवंतचे श्रवण, चिंतन करून आपले हित साधुन घ्या .आपल्या हातून कोण्याही जीवांचा मत्सर घडू नये, हीच खरी ईश्वर भक्ति आहे .तुकाराम महाराज म्हणतात, की शरीच्या कुठल्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपुर्ण शरीराला, तसेच शरीरातील जीवाला जाणवते त्याप्रमाणे विष्णुमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या हातून घडला असता तो इश्वराचा मत्सर केल्यासारखा आहे .

अभंग क्र.२२

अर्थ:-

आम्ही प्रपंच्यातील सर्व आशा- अपेक्षा, विषयवासना सोडून प्रपंच्याविषयी उदासीन झालो आहो .हे परमेश्वरा, त्यामुळे आता आम्हाला मरणाची भीति वाटत नाही .जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनूण राहु; मग भले सुख येवो वा दुःख येवो माणपान, सुखदुःखाचे आमच्या जीवनातून उच्चाटन झाले आहे .तुकाराम महाराज म्हणतात, या माझ्या प्रपंच्याविषयीच्या उदासिनतेचि मला खंत वाटत नाही .

अभंग क्र.२३

अर्थ:-

या जगात आपली कुणी स्तुति करो वा निंदा करो, मला त्याचे काही सुखदुःख वाटत नाही .कारण निंदा व स्तुति या दोन्ही गोष्टीं पासून मी निराळा आहे .पूर्वसंचितानुसार या देहाला सुखदुःख प्राप्त होतात, ते देहभोग मी निमुटपने भोगतो.तुकाराम महाराज म्हणतात मी विठ्ठलरूप असल्यामुळे माझे देह भोग मी विट्ठलालाच अर्पण करीत आहे.

अभंग क्र.२४

अर्थ:-

भक्तीचेप्रेम प्राप्त झाल्यामुळे जन आणि अरण्य आम्हाला समान भासते .जिकडे पहावे तिकडे आम्हाला विठ्ठल-रखमाईच दिसते .जनात आणि वनात आम्हाला काहीच फरक जाणवत नाही; कारण माझे मन देहावर नाही सर्वत्र माझी समदृष्टी झाली आहे .तुकाराम महाराज म्हणतात मी विठ्ठलाच्या नामसंकीर्तनामधे तन्मय झालो त्यामुळे मला सूखदुःखाची आठवनहि राहत नाही .

अभंग क्र.२५

अर्थ:-

खरा हीरा ऐरणीवर ठेऊन वरुण घन मारला तरी फुटत नाही .त्याच हिर्‍याला खरे मूल्य असते चुरा होतो तो कृत्रिम होय .ज्याच्या संगतित सूत जळत नाही, तोच खरा मोहरा होय .तुकाराम महाराज म्हणतात, संत ही तसेच असते, जे जगाचे आघात सहन करत असतात.

अभंग क्र.२६

अर्थ:-

संतांच्या अलिंगनाने, सहवासाने सायुज्य मोक्षाची प्राप्ति होते .अश्या संतसहवासाचा महिमा शब्दातून वर्णन करतांना शब्द अपुरे पडतात .संतांच्या पायाशी सर्व तीर्थ व पर्वकाळ एकवटलेले असतात .तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच संतचरणांची सेवा करावी .

अभंग क्र.२७

अर्थ:-

संत-सज्जनांमुळे मझ्यातील “मी पण” लयास गेले आहे .कारण प्रपंच्यातील विषयभोग आम्ही भोगत नसून, आमच्या हृदयतील परमेश्वर भोगत असतो .घात हित होण्याचे जे काही निमित्त आहे तेच मी टाळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्या मुळे जीवनातील कर्म-कुकर्मचि चिंता उरलीच नाही.

अभंग क्र.२८

अर्थ:-

त्यांचेच शरीर चिंतामणी आहे ज्यांच्या शरीरातून अहंकार, आशा हे समूळ नाहीसे झाले आहेत. ज्यांच्या शरीरातुन निंदा, हिंसा, कपट, देहबुद्धी नाहीशी झाली तो अगदीच स्फटिका प्रमाणे निर्मळ आहे जसा स्फटिक मनी असतो अगदी त्याप्रमाणे तो मनुष्य आहे. मोक्षाची प्राप्ती करुन देणारे काशी या तीर्थक्षेत्री सुद्धा त्याला जाण्याची गरज नाही सर्व काही त्याच्याजवळ आपोआप येते, कारण तो स्वतःच तीर्थक्षेत्र झालेला असतो आणि त्याच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो. अहो ज्याचे मन शुद्ध झाले आहे त्याला माळ मुद्राचे बाह्य भूषण काय करायचे आहे कारण त्याचे अंतरंगाचं शुद्ध झाले असते त्यामुळे तो त्याच भूषणने मंडित झालेला असतो. हरीचे गुण गर्जुन वर्णन करतात इतरांना सांगतात ते स्वतःच्या मनाने आनंदित असतात. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने आपले तन मन आणि धन हे सर्व पुरुषोत्तमाला दिले व ज्याला कशाचीही अपेक्षा नाही, तो मनुष्य परीसा होऊनही वेगळा आहे त्याचा महिमा कसा वर्णन करावा

अभंग क्र.२९

अर्थ:-

आपण जे काही कर्म करतो ते सर्व कृष्णाच्या कृपेनेच करतो त्यामुळे ते सर्व कृष्णाला अर्पण करावीत अशी भावना ठेवावी परंतु अज्ञानी जीव तसे न करता सर्व कर्मे मीच करत आहे असेच भावना मनात ठेवतात.त्यामुळेच पंचमहाभूते जीवाला त्याच्या अहंकारामुळे व भ्रमा मुळे शोधत शोधत येतात व त्याला पुन्हा पुन्हा देहाची पुन्हा पुन्हा प्राप्ती करून देतात.आपण जे काही कर्म करतो ते सर्व श्रीकृष्णाचे आहे याची जाणीव राहत नाही त्यामुळेच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त होण्याचा दंड प्राप्त होतो.तुकाराम महाराज म्हणतात काळाने आपला गळा दाबलेला आहे तरी देखील हा जीव “मी मी” असे करतच आहे तेही वेळोवेळा.

अभंग क्र.३०

अर्थ:-

ज्याने अजुन क्रोधचा त्याग केला नाही तो जातीने ब्राम्हण असला तरी त्याला ब्रांम्हण म्हणू नये .त्याने देहान्त प्रयाचित्त जरी घेतले तरी त्याची शुद्धि होत नाही .आशा मनुष्याचा चांडाळास देखिल विटाळ होतो कारण त्याचे मन रागामुळे विटाळलेले असते .तुकाराम महाराज म्हणतात, आशा व्यक्तीला स्पर्श करणारा, त्याच्या सानिध्यात राहणार्‍या व्यक्तीचे चित्त सुद्धा तसेच होते आणि तो देखिल त्याच जातीचा होतो त्याला त्याची वृत्ती प्राप्त होते .

अभंग क्र.३१

अर्थ:-

क्रोधाने वेडा झालेला मनुष्य तेलनिवर रुसून तेल आनावयास गेला नाही व रुक्ष अन्न खात बसला .ज्याला आपले हित समजत नाही, हरी भक्ति करत नाही त्याचे अंति अहितच होते.एक स्री समाजाने त्रास दिला म्हणून नवरा, मुलबालांविषयी प्रेम न बाळगता त्यांचा त्याग करते, डोक्यावरील केस कापून टाकते.एक स्रि शेजारनिवर रुसून घर सोडून गेली, तेव्हा तिच्या घरात कुत्रे शिरले.एकान घरात पिसवा झाल्या म्हणून क्रोधान स्वताचेच घर जाळले त्यात स्वतांचे नुक्सान स्वतानेच केले.एका स्रि ने उवा झाल्या म्हणून लुगडे सोडले, तर नागवेपणने तिचिच फजीति झाली, तुकाराम महाराज क्रोधच्या आहारी गेलेल्या व्यक्ति स्वताचे नुकसान स्वताच कश्या प्रकारे करुण घेतात याची उदाहरणे देतात.त्या मुळे आपल्याला आपली हित हे कळाले पाहिजे, आपला क्रोध आपल्याला आवरता आला पाहिजे, प्रपंच नुस्ताच पैश्याने नहीं चलात आणि नुस्ताच चगल्या माणसाने नाही चालत तर त्याला पर्मार्थाची जोड असायला हवि तेव्हा आपल्याला आपले हित अहित कळते.

अभंग क्र.३२

अर्थ:-

मला संत सज्जनांचा दासांचा दास कर भगवंता .त्यासाठी कल्पांत होई पर्यंत मला गर्भवासाला घ्यायला आवडेल .निच काम मी करने पण मी माझ्या मुखाने सतत तुझे हरिनाम उच्यारीन .तुकाराम महाराज म्हणतात, तुझी सेवाभक्ति हाच माझ्या जीवनाचा संकल्प असावा .

अभंग क्र.३३

अर्थ:-

ज्याच्या चित्तामधे प्रपंच्याची सतत हळहळ, तळमळ चालु असते, .त्याचे मला दर्शनहि होउ नये, तो जिवंत असुनही मेल्यासारखा आहे.ज्याच्या मुखी नेहमी कुशब्द, अश्लील शब्द असतात, ती अमंगल वाणी माझ्या कानी पडू नये .तुकाराम महाराज म्हणतात जो दुसर्‍याशी कधीच चांगले बोलत नाही, जो कोणावरहि परउपकार करत नाही, अश्या मनुष्याचे दर्शन घेण्याची माझी इच्छा नाही.

अभंग क्र.३४

अर्थ:-

जो नेमधर्म एकादशी व्रत पाळीत नाही, तो प्रेतासमान समजला जावा .काळही त्याच्यावर रागाउन करकरा दांत खात असतो .ज्याच्या दारामधे तुळशीवृंदावन नाही, ते घर स्मशाणा प्रमाणे आहे .ज्याच्या कुळा मध्ये एकही वैष्णव नाही त्याचे संपूर्ण कुळच भवनदि च्या त्रिविध तापात बुडते . ज्या मुखामधे विठ्ठलाचे नावच येत नाही, ते चर्मकाराचे कुंड समजावे .तुकाराम महाराज म्हणतात जो हरी कीर्तनाला जात नाही, त्याचे हात पाय लकडा प्रमाणे असतात, असे मानावे.

अभंग क्र.३५

अर्थ:-

आम्ही सदैव गरीब आहोत, दरिद्री आहोत; त्यामुळे चोरांना देखील आमच्या जवळ येण्यास भय वाटते . आम्ही घर सोडून भिक्ष्या मागण्यास जातो तेव्हा कुत्री आमच्या घराच राखन करतात .अशी हरी भक्तिचि ख्याति आहे, हरी भक्तिमुळे आम्हाला थोरपंण लाभल आहे .आम्ही हरिभक्तीचे जे घर तयार केले आहे त्याला नाजुक लाकडे वापरली आहेत ते घर अक्षय आहे , एरांडा व शेराची लाकडे आम्ही घराला वापरली आहेत ते दुसऱ्या कुणाची भर सहन करत नाही.आमच्या घरी धनधान्य भरपूर आहे आम्ही केवळ आमच्या पोटापुरते भीक्षा मागतो, गुरेढोरे त्यांचा गोठा याचे कोण रक्षण करत बसेलआम्ही सर्व बाबतीत निश्चिंत झालो आहोत आमचे भाडंवल म्हणजे शेण , माती आहे आमच्या घराच्या भिंतीला शेणाने आम्ही चांगले सारवून घेतो व त्यानेचआमचे तुळशीवृदावंन लखलखित झालेले दिसते .तुकाराम महाराज म्हणतात देवने आमचा सर्व हेवा पूर्ण केला व आमच्या कुटुंबाचा भार विठ्ठलावर आहे आमच्या कुटुंबाची सेवा विठ्ठलच करत आहे, असे आम्ही नशीबवान आहोत .

अभंग क्र.३६

अर्थ:-

वारकरी संप्रदायाच्या वचनाप्रमाने परस्त्रीला मातेसमान मानल्याने कोणतेही नुकसान होत काय परनिंदा, परद्रव्य अभिलाषा न धरल्यानेही नुकसान होते काय एका जागी बसून हरिनाम स्मरण केल्यानेही कोणत्याही प्रकारचे श्रम होते ते काय सांगासंतांच्या वचनावर विश्वास ठेवल्यानेही लाभच होतो; त्यात तुमचे नुकसान मात्र काही होते काय सत्य बोलन्यासाठी सुद्धा काहीच कष्ट पडत नाही तुमचे नुकसान मात्र काही होते काय तुकाराम महाराज म्हणतात अशा शुद्ध आचरनाने देह-बुद्धि परमेश्वराशी जोडलि जाते, त्याला इतर कर्माचि आवशकता भासत नाही.

अभंग क्र.३७

अर्थ:-

बिज शुद्ध असले तर येणारे फळ पण उत्तम उपजते .ज्याच्या मुखी हरिणामामृत असते, त्या मधुर वाणीमुळे त्याचा देह सत्कारणी लागतो .जो देह-चित्त-बुद्धिने निर्मळ आहे, त्याचे चित्त गंगाजलाप्रमाने पवित्र असते.तुकाराम महाराज म्हणतात, अशा संतांच्या दर्शनाने त्रिविध ताप नष्ट होतात आणी जीव विसावा घेतो.

अभंग क्र.३८

अर्थ:-

चित्त समाधानी असेल तर सोने सुध्दा विषासमान भासते .विषयलोलुपता जीवनाला घातक ठरते, तुम्ही विचारी गृहस्थ हे सर्व काहि जाणता.मनामध्ये प्रपंच्याविषयीची भोगलालसा असेल तर शरीराचा दाह चंदनाच्या उटिनेही कमी होत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंच्याविषयी आसक्ती असलेल्या माणसाला कितीही मिळाले तरि तो मनुष्य असंतृष्ट राहतो.

अभंग क्र.३९

अर्थ:-

फुले सुगंधी असता त्याचा वास घेण्या करता त्याचा चोळामोळा करू नये, गोजिरे मूल आपल्याला आवडते तर ते आपण खात नाही.मोत्याचे पाणी निर्मळ आहे म्हणून मोती चाखु नये, विविध वाद्य मधुर वाजतात म्हणून ती फोडुन पाहू नये. तुकाराम महाराज म्हणतात तसेच कर्म केल्या नंतर त्याच्या फलाची अपेक्षाहि करू नये, हेच भक्तीचे वर्म आहे.

अभंग क्र.४०

माया म्हणजे ब्रम्ह आहे आणि ब्रम्‍ह म्हणजेच माया आहे यांचा संबंध देह आणि सावली यांच्या सारखा आहे.देहाचि सावली शस्राच्या अघाताने तुटत नाही, ती सावली देहाला सोडून दूर सरत नाही,लोटांगण घातले असता देहाखाली ती नाहीशी होते.ब्रम्ह आणि माया एकरूप असतील तर तेथे विचाराच्या बळाचा वापर कश्यासाठी करायचा.तुकाराम महाराज म्हणतात जसा देह उंच बुटका असेल तशी सावली असते, लोटांगनाने ती नाहिशी होते तशे ब्रम्हाला लोटांगण घातले, शरण गेले असता मायाही नाहिशी होते.

अभंग क्र.४१

अर्थ:-

दुर्जनाना जे मदत करतात ते शिक्षेस पात्र ठरतात.एखादी स्त्री वेश्येच्या सानिध्यात राहिल्याने शिंदळकी ( दुर्वर्तन) करू लागते .दोन लाकडी एकमेकांवर घासली गेली की अग्निचि निर्मिति होते.वाइटाच्या संगतिने चांगल्या मनुष्याची वृत्ती बिघडते; तुकाराम महाराज म्हणतात की, अशा दृष्टांचि नाके आम्ही कापून काढू म्हणजे त्यांच्या पासुन इतरांचे नुकसान होणार नाही.

अर्थ:-

भूमी, राज्य, द्रव्य यांच्या लोभान जो हरिभक्ती करतो त्याला देव भेटत नाही हे निश्चीत जाणावें.हमाल पाठीवर ओझे वाहतो, पण त्याच्या ओझ्यामधील कोणत्याही वस्तुचा त्याला लाभ होत नाही.मनामधे इच्छा-आकांक्षा ठेउन देवाची पूजा करणारा पाषाणासारखा असतो. असा पाषाणच पाषाणाची पूजा करतो.तुकाराम महाराज म्हणतात मनामधे विषयाचि लालसा धरून केलेले कर्मे हे वेष्याच्या शिंदळकि प्रमाणे असतात.

अभंग क्र.४३

अर्थ:-

या भुमंडळी संतसज्जनच एक पवित्र, शुद्ध आहेत.त्यांच्या मनात फक्त परमेश्वराविषयीच प्रेम, भक्ति असते.धनद्रव्याने समृद्ध, बुद्धिने तल्लख असे ते संत या जगात भाग्यवंत आहेत .तुकाराम महाराज म्हणतात अशा संतसज्जनाची सेवा केली तर ती देवाला पावते.

अभंग क्र.४४

अर्थ:-

प्रपंच्याविषयी आसक्त असणारे जिव परमेश्वराला काय जाणून घेऊ शकतात त्यांना स्वताच्या इंद्रियाची सेवा करण्यास आनंद वाटतो .तो भ्रमिष्ट स्वताच्या जीवनाचे हित जाणु शकत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, सुग्राम अन्नात विष कालवले असता ते सर्व अन्न वाया जाते, त्या प्रमाणे मनात भोगलालसा असणाऱ्या जीवाचे जीवन व्यर्थ जाते.

अभंग क्र.४५

अर्थ:-

भोजनाच्या तृप्तीनंतर दिलेली ढेकर खरी असते, पण भोजन न करता दिलेली ढेकर हे ढोंग असते .भोजन करुन तृप्तीने दिलेली ढेकर हा अनुभव असतो, तर भोजन न करताच दिलेली ढेकर हे फोलपटा प्रमाणे असते .गव्हाच्या पीठाची पुरणपोळी बनते, म्हणून केवळ पीठ खल्याने पुराणपोळी खाल्ल्याचा अनुभव येत नाही .म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हातात कंकण दिसत आहं तरी आरसा पाहणे हे निरर्थ असते .

अभंग क्र.४६

अर्थ:-

देवाची पूजा करायची असेल तर मनोभावे करावे चांगल्याप्रकारे करावे तेथे उगाचंच पूजेचे साहित्य वगैरे ठेवून पूजा करायचा लौकिक दाखवायचे त्याचा काय उपयोग आहेआपल्या अंतःकरणातील खरी पूजा ज्याला कळायला पाहिजे त्या देवाला आपल्या अंतःकरणातील खरा भक्तिभाव समजतो कारण भक्ताच्या अंतःकरणातील सत्य भाव देव ओळखतो व तेच त्याला आवडते.काहीतरी उगाचच आगोचर पने कर्म केले तर त्याच्या पासून एकतर लाभ तरी होतो किंवा घात तरी होतो जसे बीज असेल तसे फळ मिळते त्या प्रमाणे ज्या व्यक्तीच्या चित्ता मध्ये जसे असेल तसा त्याला लाभ होतो.तुकाराम महाराज म्हणतात ज्या भजनाने आपले अंतकरण समाधान पावते असे भजन आपल्याला भवसागरच्या पलीकडे पोहोचवत असते.

अभंग क्र.४७

अर्थ:-

सदा-सर्वकाळ संसाराची चिंता करतात त्यांना क्षणभराचिसुद्धा विश्रांति मिळत नाही .देव धर्म त्यांनी कोपर्‍यात टाकले आहेत, संसारातील कामपुर्तिसाठी जेव्हा हवे तेव्हा त्यांचा उपयोग करतात .रात्रं दिवस कष्ट केले तरी कुटुंबाचे समाधान होत नाही, त्यामुळे त्यांचे देवाकडे लक्ष जात नाही .तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा विषयी त्यांची मोठी चूक होते असे प्रापंचिक लोक स्वतच स्वतची हत्या करतात .

अभंग क्र.४८

अर्थ:-

ज्या गावामधे परमेश्वराची सेवा व भक्ती घडत नाही ते गाव स्मशानवत व तेथील रहिवाशी प्रेतरूप असतात .कुत्र्याप्रमाने भटकुन ते पोट भारतात, त्यामुळे त्यांच्या घरामधे यमदूताचि वस्ती असते .जेथे हरिहरांची पूजा भक्ति घडत नाही, ते स्थान चोरांचे, नास्तिकांचे वस्तीस्थान बनते .तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना आपले हित विठ्ठलभक्तीत आहे हे न कळाल्यामुळे ते यमाचे कुळे बनले आहेत .

अभंग क्र.४९

अर्थ:-

जे कोणी एकादशी आणि सोमवार हे व्रत करत नाही त्यांची गत काय होईल काय माहित काय करावे सर्व लोकांचे कल्याण व्हावे यासाठी खूप तळमळ वाटते परंतु हे सर्वच संसारिक लोक आंधळी व बहिर्मुख आहेत. हरी व हर म्हणजे हरी आणि शंकर या दोन देवतांना जे लोक बोटभर वातीने देखील ओवाळत नाही त्यांची गती काय होईल हे काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्या कोणाला नारायणा विषयी आवडच नाही त्यांची गती काय होईल ते काही मला कळतच नाही.

अभंग क्र.५०

अर्थ:-

ज्या घरामधे दुर्वर्तनी पुत्र जन्माला येतो, त्याचे पीतर दुःखाने आक्रोश करत असतात .अश्या पुत्रांचा त्याच्या मातेच्या उदरात असतानाच गर्भपात का झाला नाही त्याची माता वांझ का राहिली नाही अश्या पुत्राला तिने का बरे जन्म दिला अशा अभाग्याचे मन सतत परपीड़ा, परनिंदा करण्यात रमते .त्याला एखाद्या दिवशी निंदा, चहाडी करण्यास मिळाली नाही तर उपवास घाडल्याप्रमाणे वाटते .परोपकार, पूण्य यांचे त्याला वावडे असते जसे विषारी कीडे दुधात टाकल्यावर मरून जातात तसाच हा आहे .तुकाराम महाराज म्हणतात, असा मनुष्य साक्षात विटाळाची मूर्ति असतो; त्याच्या मनामधे दया, क्षमा, शांतीचा लवलेश नसतो .

अभंग क्र.५१

अर्थ:-

शीघ्रकोपि मनुष्य स्वताच्या नाश करून घेतो, तो कुत्र्यप्रमाणे असतो .ज्याला दुसर्‍याचा आदर करता येत नाही, आणि ज्याच्याकडे धैर्य नसते, त्याला उपदेश व दुध पचतच नाही ते वाया जातो .माणसांना तो अपशब्द बोलतो म्हणून त्यावर लोक थुंकतात .तुकाराम महाराज म्हणतात, आशा अमंगळ वृत्तीच्या लोकांची फजीती करावी .

अभंग क्र.५२

अर्थ:-

आपुल्याला पुत्र झाला म्हणून एक स्त्री मनातून आनंदी झाली ; पण पुढे तो पुत्र भांडखोर, चोर, दुर्वर्तनी निघाला .तो जिकडे जाईल तिकडे लोकांना पीडा देत असे, त्यामुळे लोक त्याला त्रासले होते, त्याच्या आईने मोठी चूक केलि की तिने जन्मतच त्याला मरून टाकले नाही .ज्याच्या देहभाराने भूमि थरथर कापते , जो दुसर्यांना अपशब्द बोलतो, ज्याचे चित्त मलिन व पापी आहे, तो साक्षात कुंभीपाक नरकाचे रूप आहे .तुकाराम महाराज म्हणतात, तो दुराचारी, चांडाळ असून पापालासुधा त्याच्या संगतीत विटाळ होतो, अशा खळप्रवृत्तीचा धिक्कार असो .

अभंग क्र.५३

अर्थ:-

मी गाणे जानत नाही, माझा कंठ सुस्वर नाही; पण हे पांडुरंगा, माझा सर्व भार तुझ्यावर आहे .कोटा राग गाण्यासाठी कोणती वेळ, काळ योग्य की अयोग्य मी हे जानत नाही; पण माझे चित्त मी तुझ्या पायावर वाहिले आहे .तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, मला तुझ्यावाचून इतर जनांची आवड नाही .

अभंग क्र.५४

अर्थ:-

आपल्या काव्यात काव्यगुण नसतांना कहीजण कविता रचतात आणि माझी कविता पाठ करा असे दरोदारी जाउन लोकांनां सांगतात .जे जाणकार आहेत, ते त्यांची योग्य पारख करतात मग तेथून जातांना त्या स्वतला कवी म्हणावणारर्‍याची मान लाजेने खाली जाते .उष्ठावळी जमा करुण बळेच प्रेमाचे आव आणतात .तुकाराम महाराज म्हणतात अश्या वरकर्णि भगवंतभक्तिचा देखावा करणारे भगवंत चरणी लीन होत नाहीत.

अभंग क्र.५५

अर्थ:-

प्रायश्चित्ताने संसार रुपी उपाधीचे निवारण करता येते, तद्ववत प्रपंच्यातील उपाधीपासून सुटका होण्यासाठी मी शिंतोडा उडवुन घेतला आता प्रपंच्याची पीडा मला मी शिवु देणार नाही.भक्तिमार्ग हाती घेतलेला असतांना कशासाठी एखाद्या अमंगळ वस्तुस स्पर्श करुण हात धुवावे .या विश्वामधे भगवंतने जे जे निर्माण केले आहे ते ज्ञानदृष्टीने पाहिले असता आपल्या हिताचे आहे हे कळते .तुकाराम महाराज म्हणतात, अशी ज्ञानदृष्टी प्राप्त होण्यासाठी अहंकाराचा नाश झाला पाहिजे माझा अहंकार गेला म्हणजे आपले-परके हा भेदच संपला .

अभंग क्र.५६

अर्थ:-

योगाचे भाग्य हे क्षमा आहे जो इंद्रियांचे दमन करतो ज्याच्या चित्तामधे क्षमा असते तो योगी असतो .त्या मुळे देव त्याचा सोयरा होतो आणि त्याला सर्व सुखांची प्राप्ति होते .ज्या प्रमाणे ईनामी मिळालेल्या शेतातसुद्धा कष्ट केल्याशिवाय पिक येत नाही . तुकाराम महाराज म्हणतात , योग्य अयोग्य जाणुन घ्या , नाहीतर वृथा शिण होईल.

अभंग क्र.५७

अर्थ:-

ज्याच्या नेत्रांमध्ये परमेश्वराबद्दल प्रेमाने पाणी येत नाही, ज्याच्या अंतरि भक्तीचि तळमळ नाही .त्याचे बोल हे वृथा लोकांना रंजविणारे असतात .आणि असे रंजक बोल निष्फळ ठरतात .ज्याच्या मना मध्ये आपल्या स्वामी हरी,गुरु विषयी आदर नसतो त्यांनी उपदेश फल्द्रुप होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात,जो पर्यंत समोरा समोर भेट होत नाही तो पर्यंत आम्ही भेटलो म्हणणे उपयोगाचे नाही .

अभंग क्र.५८

अर्थ:-

एका ढोंगी, कर्मठ मनुष्याने आपल्या माता-पित्याचे श्राद्ध घातले, आईसाठी सवासिन म्हणून आपल्या बायकोला बसवले व वडिलांच्या जागी ब्राम्हण म्हणून आपणच बसला .त्या मुळे त्याचे श्राद्ध निष्फळ झाले; कारण या गोष्टी धर्मशास्त्रानुसार ग्राह्य नाहीत .असे विषयलोलुपता गृहस्थ स्वतच्या जीवनाचा नाश स्वतःच करून घेतात .तुकाराम महाराज म्हणतात , असे पाखंडी, अहंकारी लोक दगडालाच देव मानतात .

अभंग क्र.५९

अर्थ:-

ज्याचा हात दानासाठी थरथर कापतो व् ज्याला दानधर्म करण्याचा सल्ला दिला तर अवडत नाही .ज्याला कथेच्या वेळी फक्त चावट बोल बोलने आवडते, दुधात हींग घातले असता ते वाया जाते, तसे त्याचे भाषण ढोंगिपणाचे असते .त्याचे पाय तीर्थ यात्रेला वळत नाहीत; कारण तो गरीब, दरिद्रयाचे ढोंग करतो .तुकाराम महाराज म्हणतात, जर एखाद्या मनुष्याला मनापासून वाटत नसेल तर ती गोष्ठ त्यांच्या हातून कधीच घडत नाही .

अभंग क्र.६०

अर्थ:-

गाई-गुरे वळणाऱ्या गुराख्याला परमेश्वर भक्ती करण्यासाठी कष्ट करावे लगत नाही त्यांना कर्मकांडाची आवशकता भासत नाही .त्याच्या मनातील भक्तिभाव व शुद्ध आचरण पाहुन परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होतो .परमेश्वराला वश करुण घेण्यासाठी कोणत्याही दिखाऊ पणाची त्यांना गरज नसते .तुकाराम महाराज म्हणतात, जो आपला अहंकार, मनपान, मोठेपणा विसरून हरीला शरण जातो, त्याला परमेश्वर वश होतो .

अभंग क्र.६१

अर्थ:-

महाबलवान मित्र जोडलेस तरि ते अंतकाळी उपयोगी पडत नाही .तेव्हा मृत्यु येण्याआधी रामनाम संपत्ति तू जमवुन ठेव .रामनामाचि संपत्ति नसेल तर यम (काळ) कराकरा दांत खाईल .धन-संपत्ति कितीही मिळवली तरी काळाचा आघात हा होणारच आहे .तुझ्याजवळ सैन्य, परिवार, नातेवाईक कितीही असले तरी शेवटी कोणीच कामाला येणार नाहीत .जो पर्यन्त काळाचा आघात होणार नाही तो पर्यंत तुझी शक्ती कामे करील .तुकाराम महाराज म्हणतात, अहोबापांनो चौर्‍यांशीचा फेरा चुकविण्यासाठी, तुला राम नामाचे साधन जमविले पाहिजे .

अभंग क्र.६२

अर्थ:-

जीवनात सुख हे फार थोडे असते, दुःख मात्र पर्वतायेवढे असते .ते दुःख कमी करण्यासाठी संतवचन, संत्सहवास आवश्यक असतो .मानवाच्या आयुष्याचि अर्धी वर्ष रात्री झोपण्यात जातात, बाकीचे बालपन, म्हतारपणात, आजारपणात जातात .तुकाराम महाराज म्हणतात, हे मूर्खा, असे आयुष्य निरर्थक गेले तर जन्म-मृत्युच्या घाण्यामध्ये तू बैलासरखा फिरत राहशील

अभंग क्र.६३

अर्थ:-

एका कानडी भाषा बोलणार्‍या स्त्रीने मराठी भाषा बोलणारा नवरा केला , त्यांना एकमेकांचे बोलणे न कळल्याणे विपर्‍यास निर्माण होत असे .तशी माझी स्थीति हे कमलापती, तू करू नकोस, मला संतसहवास घडू दे .त्या कानडी स्त्रीने त्याला ‘इल बा’ (इकडे या) म्हंटले .त्याने बा’ म्हणजे बाबा असा अर्थ:- घेतला व भलता गैरसमज करून तो दूर पळू लागला. तुकाराम महाराज म्हणतात अशी परिस्थीती झाली म्हणजे जीवनात विसंगतीचे दुःख निर्माण होते.

अभंग क्र.६४

अर्थ:-

जे संतांची निंदा करणारे नास्तिक लोक असतात त्यांचा माझा संबध येऊ नये .हे गोविंदा, जे तुला विसरतात, ते संतांची निंदा करतात .अश्या नास्तिकांचे तोड पाहण्याची देखील माझी इच्छा नाही, असे लोक माझ्या दृष्टिस पडू नयेत .तुकाराम महाराज म्हणतात, हे परमेश्वरा, मला त्यांच्यापासून दूर ठेव .

अभंग क्र.६५

अर्थ:-

हे साधका, समाज्यात कर्मकांडाला महत्त्व देणारे तीळ, तांदूळ यज्ञ करुण तू होमामधे जाळतोस, पण स्वतच्या स्वभावातील काम-क्रोधादी शत्रु मात्र तू तसेच ठेवतोस .यज्ञयागादि कर्मकांडामध्ये व्यर्थ का स्तला शिणुन घेतोस, त्यापेक्षा पांडुरंगाची सेवा का करात नाहीस .समाजात मानसन्मान मिळविण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी ग्रंथपठण, विद्याअध्यायन करण्याचे कृत्य तू करतोस .तीर्थाटन करुण स्वतविषयी अभिमान वाढविलास .दानधर्म करुण आपल्या दातृत्वाचे प्रदर्शन करुण, अहंकार बाळगलास .तुकाराम महाराज म्हणतात, की हे कर्मकांड म्हणजे अधर्माचे वर्म आहे .

अभंग क्र.६६

कुटुंबाची सेवा करता करता मी या प्रपंचिक त्रासाने त्रासुन गेलो आहे .म्हणून मी तुझे चिंतन करत आहे, हे पांडुरंगा, मला भेटायला ये .अनेक जन्मांचा भार वाहून मी श्रमलो आहे, यातून सुटण्याचा उपाय माला सापडत नाही .कामक्रोधादिक षडरीपुंनी मला चहुबाजूंनी वेढले आहे, माझी दया कुणालाच येत नाही .त्यामुळे मी अस्वस्थ झालो आहे, सर्वांनी मला लुटले आहे, माझी तळमळ होत आहे .तुकाराम महाराज म्हणतात, हे दिनानाथ, आता तूच माझा तारणहार आहेस, अनाथांचा तू नाथ आहेस, अशी जगी तुझी ख्याति आहे, तेव्हा तूच अता माझे रक्षण कर .

अभंग क्र.६७

अर्थ:-

देव भक्तांचा ऋणी आहे, भक्तांनी आपल्या भक्तीने त्याला बांधून टाकले आहे, असे पुराणाने सांगितलेले आहे .पूर्वीची अशी गोष्ट सांगितली, की संत कबीरांनी विणलेली वस्त्रे बाजारात नेउन वाटली तेव्हा एक माणूस वस्त्रा साठी विणवनी करीत असताना कबीरांनी आपल्या आंगावरील अर्धे वस्त्र त्याला दिले .तो वस्त्रहीन मनुष्य साक्षात परमेश्वर होता .संत नामदेवांना पण असाच अनुभव अला त्यांचेही धन परमेश्वराने ब्राम्हणाकडून लुटविले .या सर्व प्रत्यक्ष घडलेल्या कथा आहेत, एकनाथांच्या भक्तीचे ऋण फेडण्यासाठीसुध्दा विठ्ठलाने नाथांच्या घरी पानी भरले, कष्ट केले .शेतात पेरण्यासाठी आलेले बी दळून नाथांचे पणजे संत भानुदासांनी संतांना भोजन दिले .तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठ्ठला बद्दल ज्याला प्रेम नाही, तो या भवसागरातून पार पडू शकत नाही .

अभंग क्र.६८

अर्थ:–

विवेकरुपी बुध्दी ठेउन प्रपंच्यातील विषयभोग भोगले त्याचे तर त्याचे त्यागत रूपांतर होते, पण अविचाराने भोगाचा त्याग केला तर तो सफल होत नाही . खरे तर हे ऊफराटेच दिसते भेगाचा त्याग करणे हा धर्म आहे तरीही कधी कधी अधर्मच होतो आणि भोग भोगल्याने धर्म होतो. धर्मामधेच अधर्म लपलेला असतो .ज्या कर्मामुळे परमेश्वर व् भक्त यांच्यामध्दे द्वैतभाव निर्माण होतो, ती सर्व पापकर्मे ठरतात .तुकाराम महाराज म्हणतात, शुध्द अतःकरणाने भिडेचा(कोणाच्‍याही भिडे पोटी) सर्व त्याग करावा म्हणजे जीवनातील सर्व लाभ मिळून जीवन सार्थक होते .

अभंग क्र.६९

अर्थ:-

बहुरूपी वरवर विविध सोंग घेऊन दखवितो अथवा बगळा मासा पकडण्यासाठी डोळे बंद असल्याचे सोंग करतो .त्या प्रमाणे भक्तीचे ढोंग करणारा टिळा, माळ, मुद्रा लाऊन जगाला फसवित असतो .कोळी मासे पकडण्याआधी गळाला खाद्य लावतो, त्या खादयामधील फासा माश्याला समजून येत नाही .खाटिक बकर्‍याला कापण्याआधी प्रेमाने पाळत असतो .तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तू माझा अव्हेर करू नको; कारण तू दयाळू, प्रेमळ असा तारणहार आहेस .

अभंग क्र.७०

अर्थ:-

एखाद्या मनुष्याच्या स्वभावातील वीरत्व गेले तर त्याला कोणीही मान देत नाही एखादी क्षुद्र स्त्रीसुद्धा त्याला मारते .एकदयाची जगात नाचक्की झाली तर पुन्हा त्याला समाजात कोणत्याही प्रकारचा मान सन्मान मिळत नाही .एखादी व्यक्ती मना मधुन उतरली म्हणजे पुन्हा चित्तामधे ती बसत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, की एखाद्या मनुष्याने आत्मविश्वास जर गमवला तर त्याला जगात सर्व ठिकाणी हार पत्कारावि लागते .

अभंग क्र.७१

अर्थ:-

परमार्थ साधन्यासाठी युक्त्ताहार, साधानांची गरज नाही; कारण परमार्थ थोडक्याश्या कष्टाने साध्य होतो, हे नारायणाने सांगितले आहे .या कलियुगात कीर्तना सारखे दूसरे साधन नाही, त्यामुळे भगवंतची भेट घडते .त्यासाठी प्रपंच्याचा त्याग करून, वनामधे जावुन, भस्म-दंड धारण करण्याची काहीही आवशकता नाही .तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाच्या नामस्मरनाशिवाय इतर कोणतेही उपाय मला दिसत नाही .

अभंग क्र.७२

अर्थ:-

ज्यांच्या कंठातून कृष्णनाम येत नाही ती वाणी अशुभ आहे .अशी व्यक्ति परमार्थ मार्गात अमंगळ मानली जाते .जे हात दान देण्यास पुढे होत नाही अश्या नास्तिक मनुष्यास संत जवळ करीत नाहीत, त्याला कडक शब्दात सुनावितात त्याची चांगलीच फजीती करतात . तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या आचारणामध्ये ताळमेळ नाही, त्याला अवकळा प्राप्त होते.

अभंग क्र.७३

अर्थ:-

समाजात काही पढतमुर्ख, धर्मपंडित माया आणि ब्रम्ह यावर बडबड करुण सामान्य लोकांची दिशाभूल करीत असतात असे बोलुन ते स्वतची तर फजीती करतात परंतु दुसर्‍याची दिशाभुल करुन त्यांचीही फजीती करतात .विषयलंपट इतरांना कुविद्या, अधर्म शिकवितो, त्याच्यामागे लोक फिरत असतात .सुरन आणि मोहरी शिजवुन खाल्ल्याने लाभ होतो ,तर कच्चे खल्ल्याने अपचन होते .आजारी मुलाला कडु औषध देताना आई त्याला गुळाच्या खडयाचे आमिष दाखवते .प्रपंचाच्या भवसगरातून तरुन जाण्यासाठी वेदाचे संशोधन करुन त्यातील रहस्य जाणून घ्यायला हवे, त्यातील त्रुटि काढून टाकल्या पाहिजे .तुकाराम महाराज म्हणतात, जो स्वताच्या देहाविषयी आसक्त असतो, त्याला देव भेटने कठिण आहे .

अभंग क्र.७४

अर्थ:-

उन्हाच्या झळया हरणाला पाण्याप्रमाने भासतात म्हणून ते तहानलेले हरिण ऊर फोडून त्याच्या पाठीमागे धावत असते, मृगजळ हा एक भास आहे .मानविजिवन हे तसेच आहे, प्रपंचिक मनुष्य या सुखाच्या मृगजळामागे धावतो .आपले पूर्वसंचित ज्या प्रमाणे आहे त्याप्रमानेच आपल्याला जीवनातील सुखे मिळतात .तुकाराम महाराज म्हणतात, मानवी देहाचा शेवट श्मशानात होतो तेथे अग्नि, गोवर्‍यांशी त्याचा समंध येतो तेव्हा मानवाने नारदेहाचे सार्थक करून घ्यावे .

अभंग क्र.७५

अर्थ:-

गोकुळातील गवळ्यांची ताक-दूध पीणारी मुले मनाने चांगली होती .म्हणून प्रत्यक्ष श्रीकृणाला त्यांच्याशी नाते जुळवायला आवडले .विदुराघरी प्रेमाने दिलेल्या ताककण्यांचा आस्वाद घेतला ते, श्रीकृष्णला प्रेमळअन्नाची कमतरता भसली होती म्हणून नव्हे .तुकाराम महाराज म्हणतात, अत्यंत कुरूप, अष्टवक्रा कृब्जादासी तिच्या भक्तिप्रेमाने श्रीकृष्णला ती प्रिय झाली होती .

अभंग क्र.७६

अर्थ:-

तुकाराम महाराज प्रापंचिक मनुष्याला विनऊन सांगता, की या आयुष्याचा स्वताच्या हाताने नाश करू नका .या जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपले चित्त शुद्ध ठेवा; या साठी ते सर्वांना दंडवत घालून विनंती करतात .एकाग्र मन करुण भगवंतचे चिंतन करा .तुकाराम महाराज म्हणतात की जीवनाचे, नरदेहाचे सार्थक होईल असा व्यापार करा .

अभंग क्र.७७

भक्तावाचुन देवाची सगुण भक्ती कोण करेल भक्तामुळे भगवंताला महत्व प्राप्त होते .हीरा सोन्याच्या कोंदनातच शोभून दिसतो तसा भक्त व भगवंताचा परस्पर संबंध आहे .देवाशिवाय भक्ताला निष्कामभक्ती शिकविणारा कोणी नाही . तुकाराम महाराज म्हणतात की, आई आणि मुलाचा जसे प्रेमाचे नाते असते त्याप्रमाणे देव व भक्त यांचे नाते आहे .

अभंग क्र.७८

अर्थ:-

या विश्वाचा जनक यशोदेला माता म्हणतो .तो भक्तांचा अंकित आहे, भक्ताला त्याच्या भक्तीप्रमाणे प्रेम देत असतो .परमेश्वर निष्काम असूनही गोपीनां त्याचा वेध लागला आहे .तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या भक्तीसाठी तो अव्यक्त असुन व्यक्त, सगुन साकार रूपामधे आला आहे .

अभंग क्र.७९

अर्थ:-

सूर्योदयासमयी कोबडा आरवतो व त्यासमायी सूर्य उदयाला येतो, म्हणून कोबड्याने सूर्योदय घडऊन अणला, असे होत नाही .माझी योग्यता नसताना हे विठ्ठला, तू मला हा संतपणाचा भार का दिला आहेस  एखादी श्रीमंत व्यक्ती दासिच्या अडविण्याने उपाशी राहणार आहे काय  तुकाराम महाराज म्हणतात, मानवी जीवन सर्वस्वी परमेश्वराच्या आधीन आहे .

अभंग क्र.८०

अर्थ:-

काही मुर्ख माणसे प्रातविधीवेळी(शौच्याच्या वेळेस) वास येतो म्हणून नाकाला हात लावतात, तसेच जेवतनाही लावतात .कोणत्या वेळी काय करावे, काय करू नाही याचे ज्ञान त्यांना नसते .त्यामुळे ते आपलिच फजीति करुण घेतात .तुकाराम महाराज म्हणतात , ताक व दूध यातील फरक त्यांना कळत नाही .

अभंग क्र.८१

अर्थ:-

परमार्थामध्ये पत्नी, पुत्र, बंधू यांचा संबंध जर अडथळा निर्माण करीत असेल तर तो संबंध तोडून टाकावा .या नातेवाईकांना आपल्यापासून दूर केले असता त्यांचा दोष आपल्याला लागत नाही .एखाद्या मनुष्या मृत्यु झाला म्हणजे त्याच्या नावाने मडके फोडले जाते, त्याप्रमाणे सार्‍या नातेवाइकांचा संबंध तोडूंन टाकावा .तुकाराम महाराज म्हणतात, सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय प्रपंचिक भोग संपत नाही .

अभंग क्र.८२

अर्थ:-

एक मुर्ख स्त्री प्रसूत न होता प्रसूत झाल्याचा देखावा करते .इतर प्रसुत झालेल्या स्त्रीयांच्या क्रीया पाहुन तिही प्रसुतीचे चाळे करते, तसे साखरेची गोडी सांगुण कळत नाही, त्याचा अनुभव घ्यावा लागतो .त्याचप्रमाने न जेवताच ढेकर देणाराहि जेवनाने तृप्त झाल्याचा देखावा करुन स्वतलाच कष्टि करतो .तुकाराम महाराज म्हणतात, जीवनातील काही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो, त्याचे नाटक करता येत नाही, आणि तसे केले असता फजीतीच होते .

अभंग क्र.८३

अर्थ:-

नारायणाचि भक्ती करतांना प्रत्यक्ष जन्मदाते बाप माय जरी आड आले तरी त्यांना दूर सारावे .पत्नी, पुत्र, धन यांनाही पमार्थापासून दूर ठेवावे, परमार्थ मार्गात आड येणारे सर्व शत्रु आहेत . प्रल्हादाने आपल्या माता पित्यांचा, बिभीषणाने बंधू रावणाचा, भरताने माता कैकेयीचा त्याग करून परमार्थ साधला .तुकाराम महाराज म्हणतात, सर्वधर्म हरिच्या पायाशी असतांना इतर केलेले उपाय म्हणजे दुःखाचें मूळ आहेत .

अभंग क्र.८४

अर्थ:-

परमार्थमार्गात अहंकार निर्माण करणारे वृथा मान, अभिमान गुंधळून ठेवावे .चित्ताचे समाधान हेच देवाचे दर्शन आहे .जेथे शांति असते तेथे काळही थांबतो .तुकाराम महाराज म्हणतात प्रपंच्यातील सर्व कामविकारांच्या उर्मि शांतपणे सहन करणे म्हणजे परमार्थमार्गाची वाटचाल करणे होय.

अभंग क्र.८५

अर्थ:-

भक्तिमार्गाची वाटचाल करतांना मनाची परमेश्वराला एकरूपता साधली पाहिजे .हर्ष आणि खेद हे दोन्ही ज्यांना सामान भासतात, तेच भक्तीचे अधिकारी होतात .सर्व भक्तीमार्गाचे सार एकच आहे, ते फारसे शोधवे लागत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रपंच खोटा आहे, हे ओळखून अहंकार, देहसक्तीचा त्याग म्हणजेच परमार्थ होय .

अभंग क्र.८६

अर्थ:-

मायामोहाने भ्रमीष्ट झालेल्या जीवा,आता तरी तू डोळे उघड, मातेच्या उदारतुन तू जन्म घेऊन तु फक्त दगड आहेस .हा मनुष्य देह तुला मिळालेला आहे त्याचे तू सार्थक करून घे, संतांनी जसा भक्तिचा मार्ग धरला आणि ते भवसागरातून तरले , तसा तू भक्तिमार्ग धरुण नारादेहाचे सार्थक करुन घे .हा भवसागर तरुन जाणारी नाव चंद्रभागेतीरि, पुंडलिकाच्या द्वारी कमरेवर हात ठेऊन उभी आहे, उभ्या उभ्या ती सर्वांना बोलविते आहे .तुकाराम महाराज म्हणतात या नावेला कुठालेही मोल द्यावे लागत नाही, अनन्य भावाने त्याला शरण जाणे, हा एकच उपाय या भवसागरातून तरुण जाण्यासाठी आहे .

अभंग क्र.८७

अर्थ:-

तू कोणाचाही संग करू नको, नीश्चिल रहा, मनाला माया- मोहाचा मळ लागू देऊ नको .अशी मनाची निसंग अवस्थालाच अव्दैत स्थिती म्हणतात व खरे आत्मज्ञान, ब्रम्हज्ञान हेच होय, बाकी सर्व अनुभवावाचुन केलेले निष्फल बडबड आहे .इंद्रियांचे दमन करूण त्यांच्यावर विजय मिळविने, वासना, कामना, नाहीशी करणे, कोणत्याही प्रकारचा संकल्प मना मध्ये येऊ देऊ नको .तुकाराम महाराज म्हणतात, अश्या व्यक्तीच्याअंतकरणा मधुन अहंकार नाहिसा होतो आणि आनंदि आनंद निर्माण होतो .

अभंग क्र.८८

अर्थ:-

पंढरी या तीर्थक्षेत्राचा महिमा किती वर्णन करावा तेवढा थोडाच आहे .या सारखे ठिकाण दुसरे कोठेही नाही करण येथे भक्तांना भेटण्यासाठी देव आतुर होऊन उभा राहिला आहे .इतर क्षेत्र बर्‍याच कालानंतर फळ देणारी आहे .तुकाराम महाराज म्हणतात, पंढरी ही साक्षात भक्तीची बाजार पेठ व भुमीवरिल वैकुंठच आहे

अभंग क्र.८९

अर्थ:-

सर्व तीर्थक्षेत्रांवर दगाडाचा देव व तीर्थाचे पाणी दिसते; पण तुकाराम महाराजांना संतसज्जनांमधे देव दिसतो .अश्या संतांचा सहवास मिळाला तर तिथे देहहि अर्पण करावा .तीर्थस्नानाने पापक्षालन होत नाही जर मनामधे भक्ति भावना असेल तरच तीर्थक्षेत्री त्याचे फळ मिळते, म्हणून संतसज्जन नास्तिक लोकांना आपल्या संगतित बदलून टाकतात .तुकाराम महाराज म्हणतात, संतसज्जनांमधे राहून कि एकदा पाप गेले मग जीवनातील त्रिविध ताप नाहिसे ज़ाले हे माहित होते .

अभंग क्र.९०

अर्थ:-

हातामधे चक्र, गदा घेऊन देव सतत भक्ताचे रक्षण करण्याचा धंदा करत असतो .भक्तांचे रक्षण करुण त्यांना आपल्या पायजवर स्थान देतो; पण दुष्टांचा मात्र नाश करतो .भक्तांसाठी तो अव्यक्त रूपातुन व्यक्त रुपात येतो .तुकाराम महाराज म्हणतात, भक्तांच्या सर्व इच्छा तो पूर्ण करतो .

अभंग क्र.९१

अर्थ:-

एका मंदिरात पुराणिकाचे पुराण ऐकतांना एक धनगर स्फुंदुन स्फुंदुन रडत असे .लोकांना वाटे, तो पुराणीकांवरील श्रद्धेमुळे राडतो आहे, पण त्याला पुराणीकांची दाढ़ी पाहुन आपल्या बोकडयाची आठवण येत असे .त्याला बोकडयाचे खुर, पाय आठवत असत .इतर सर्व शेळ्यान मधे हा एकच बोकड होता .पुराणीकांने माया आणि ब्रम्ह अशी दोन बोटे वर केली की त्याला वाटे, बोकडाचि दोन शिंगे, चार वेदांसाठी त्यांनी चार बोटे वर केली की त्याला वाटे, बोकडयाचे चार पाय; या साठी या खुना आहेत .धनगराला मेलेल्या बोकडयाची आठवण येत असे .पुराणीकांना पाहुन धनगराला मेलेला बोकड आठवला, हा त्याच्या मनातील भाव शेवटी बाहर पडला .तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंचिक मनुष्याच्या अंतकरणात काही लपुन राहत नाही, सत्य बाहर पडते .

अभंग क्र.९२

अर्थ:-

दुर्जनंचा सहवास हा विष्टेप्रमाने दुर्गंधीयुक्त असतो तेव्हा सज्जनाने त्या पासून दूर राहावे .हे सज्जन हो, तुम्ही माझे एवढे ऐका, अश्या दुर्जनंचि संगत तुम्ही करू नका . दुर्जनांचे अंग अखंड विटाळलेले असते व त्याची वाणी विटाळशी स्त्रीच्या स्रवलेल्या द्रव्या प्रमाणे आहे .हे दुर्जन लोक एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखे असतात ज्या प्रमाणे पिसाळलेल्या कुत्र्या चे भय बाळगुन आपण त्या पासुन दुर पळतो त्या प्रमाणे दुर्जना पासुन दुर पळावे .दुर्जनंचि संगती करू नये, त्यांचा त्याग करावा; एवढेच नव्हे तर त्यांच्या देशाचाहि त्याग करावा, असे श्यास्त्र सांगते .तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हांला किती सांगु हे दुर्जन लोक म्हणजे साक्षात कुंभीपाक नरकाचे उदाहरण आहेत.

अभंग क्र.९३

अर्थ:-

प्रपंच्यामधे कारणाशिवाय वादविवाद करणारा हा शुद्ध बिजाचा नाही तो अत्यंज आहे असे संत सांगतात, तो विद्वान ब्रम्हण असला तरी त्याला अंत्यज पुराण समजावे .वेद, श्रुती यांना जो प्रमाण मानत नाहीत नाही, श्रेष्ठांनचे वचन जो मानित नाही .तुकाराम महाराज म्हणतात अश्या मद्यपान करणाऱ्या व्यक्तीच्या घरी मिष्टान्न सेवन करू नये, त्याला स्पर्शही करू नये .

अभंग क्र.९४

अर्थ:-

ज्याच्या शब्दात धर्य नाही, ज्याची बुद्धि अस्थीर आहे .आशा पापी व्यक्तींचे चुकुनहि दर्शन घेऊ नये, त्याच्या पंगतिला भोजनाचे लाभ घेऊ नये .तो दुर्जन संतांची निंदा करतो व द्रव्यालाभासाठी अधम श्रीमंतांच्या पाया पडतो .तुकाराम महाराज म्हणतात, अश्या व्यक्तींच्या पोटातील (हृदयातील) व ओठातील (वाणीतील) भाव वेगवेगळा असतो .

अभंग क्र.९५

अर्थ:-

एक चोर दुसऱ्या चोराला चोरिच्या, घरफोडीच्या युक्त्या शिकवितो.जसा त्याचा आभ्यास असेल तसाच उपदेश करतो .एखाद्या वेश्येच्या सहवासात एखादी घरंदाज स्त्री आली तर तीही कालांतराने वाममार्गी बनते.वाईट व्यक्तींच्या संगतिला राहून संगतीत राहणारा देखिल वाईट होते .तुकाराम महाराज म्हणतात, वाईट लोकांच्या संगती मला नको.कारण मला पुढील भविष्यकाळात त्यामुळे होणाऱ्या दुषपरीणामांचे भय वाटते .

अभंग क्र.९६

अर्थ:-

एका विवाहा प्रसंगी नवरा-नवरी वेळेवर आले नाहीत म्हणून एक तारतम्य नसलेला म्हातारा मधे बोलू लागला .नवरी वेळेवर येत नाही हे पाहुन तो म्हातारा त्या रांड नवरीला आणा आणि त्या ‘नावर्‍याचे तोड पेटून दया’ अशी अशुभ वार्ता करू लागला .कोणत्या वेळी काय बोलावे हे त्या म्हातार्‍याला कळत नाही मग त्याचा काय उपयोग आहे .तुकाराम महाराज म्हणतात, आशा मुर्ख म्हतार्‍याला मंडवातून प्रथम दूर करा .

अभंग क्र.९७

अर्थ:-

दररोज कही पारमार्थिक नित्यनेम केल्यावाचुन जो अन्न खातो, तो कुत्र्या सामान असतो, मनुष्यदेहाचा भार वाहणारा तो निव्वळ बैल असतो .त्याचा भूमिला भार होतो, त्याचे आचरण शुद्ध नसते; त्यामुळे त्याचे पितर नारकवास भोगत असतात .त्याची वाणी अमंगळ असते, तो स्वप्नात सुध्दा खरे बोलत नाही, त्याच्यासारखा पापी शोधून सपडणार नाही .तो फक्त आपल्या कुटुंबाचे पोट भरतो, त्याच्याजवळ भूतदया नाही, दाराशी आलेल्या अतिथीला हाकलुन देतो .त्याच्या हातून संतसेवा, तीर्थयात्रा घडत नाही, तो म्हणजे यमाला दिलेला एक ठेवा आहे, यम त्याला भरपूर दुःख देईल .तुकाराम महाराज म्हणतात , अश्या व्यक्ती जन्माला येऊन स्वतचेच नूकसान करून घेतात; कारण प्रपंच्यात ते रमुन जातात, त्यांना परमेश्वराची आठवण येत नाही .

अभंग क्र.९८

अर्थ:-

जी व्यकि आपली कन्या, गाय आणि हरिकथा यांची विक्री करुन धन मिळवतो, ती वृत्तीने चांडाळ आहे .मनुष्या मधील गुण-अवगुण परमेश्वर पाहतो, जात पाहत नाही.ज्या व्यक्तीच्या अंगी परमार्थ गुण आहे, ती व्यक्ती भगवंतला अतिप्रिय आहे, आणि ज्या व्यक्तीच्या अंगी परमार्थाचे गुण नाही; ती व्यक्ती देवाल अप्रिय आहे; मग ती व्यक्ती कोणत्याही जातीची असली तरी देव त्याच्याकडे पाहत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, असे आश्यावादि लोक लालसेने नको त्या गोष्टी करतात आणि नरकात जातात .

अभंग क्र.९९

अर्थ:-

हरी (विष्णु) आणि हर (शिव) यांच्यामधे भेद करून अकारण वाद निर्माण करू नये.कारण ते दोन्ही एकच आहे, जसे साखर आणि तिची गोडी .फरक करणार्‍यांच्या डोळ्याला केवळ एका वेलांटिचा फरक दिसतो .तुकाराम महाराज म्हणतात , उजवे व डावे दोन भाग एकत्र येऊन त्याचा देह बनतो त्याप्रमाणे हरी आणि हर हे सारखेच आहे .

अभंग क्र.१००

अर्थ:-

परमार्थाविषयी बोलणाऱ्यास आगोदर गंध, फुल, अक्षतादि पुजेचा मान दिला पाहिजे .श्रोता जरी संन्यासी असेल तरी वक्त्याच्या आधी त्याचा मानसन्मान करू नये .ज्याप्रमाणे देहामधे मस्तक श्रेष्ट आहे, म्हणून त्याचे पूजन प्रथम करावे; नंतर क्रमशः हात, पाय यांचे पूजन करावे; असा धर्मादेश आहे आणि तोच सर्वांनी पाळावा .ज्याप्रमाणे पुत्र वयाने जरी बापापेक्षा लहान असला आणि तो राज्याच्या आसनावरती बसलेला असेल तर बाप त्याची आज्ञा पाळतो; त्या प्रमाणे संतांचे वय न पाहता श्रेष्ठत्व पहावी आणि त्यांनाच प्रमाण मानावे .देवाची मूर्ति जरी पाषाणांची असेल तरी ती देव्हार्‍यातच ठेवावी, देवाची उपकरन चांदी, सोन्याची असली तर ती खाली ठेवावित.देव्हार्‍यात देव ठेवतात, मौल्यावान भांडी नव्हे .एकान सोन्याचे पैजनी केले आणि काचेचा मुकुटमणि केला तरी पैंजन पायातच आणि मुकुट डोक्यावरच घातला पाहिजे.जेथला अलंकार त्या जागीच घातला पाहिजे .तुकाराम महाराज म्हणतात सेवकांना मालकामुळे नावलौकिक मिळतो, तेच त्याचे धन आहे; त्याच प्रमाणे संतहो तुम्ही मालक आहात आणि मी तुकचा सेवक आहे.

संत तुकाराम महाराज अभंग गाथा १ ते १०० समाप्त

REF:- अभंग गाथा

Sanskrit Shlok-बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक ४) – शंभू राजे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top