Sant Aarti | आरती संतांची

आरती संतमंडळी ।

हातीं घेउनिं पुष्पांजुळि ओंवाळिन पंचप्राणें ।

त्याचें चरण न्याहाळी ॥ धृ. ॥

मच्छेंद्र गोरख गैनी निवृत्तीनाथ

ज्ञानदेव नामदेव खेचर विसोबा संत

सोपान चांगदेव गोरा जगमित्र भक्त

कबीर पाठक नामा चोखा परसा भागवर आरती

भानुदास कृष्णदास वडवळसिद्ध नागनाथ

बहिरा पिसा मुकुंदराज केशवस्वामी सूरदास

रंगनाथ वामनस्वामी जनजसवंत दास

एकनाथ रामदास यांचा हरिपदीं वास

गुरुकृपा संपादिली स्वामी जनार्दन त्यास

मिराबाई मुक्ताबाई बहिणाबाई उदास

सोनार नरहरी हा माळी सांवता दास

रोहिदास संताबाई जनी राजाई गोणाई

जोगापरमानंदसाल्या शेखमहंमद भाई

निंबराज बोधराज । माथा तयांचे पायीं ॥ Sant Aarti

कूर्मदास शिवदास मलुकदास कर्माबाई

नारा म्हादा गोंदा विठा प्रेमळ दामाजी

तुकोबा गणेशनाथ सेना नरसीमहत

तुलसीदास कसांबया पवार संतोबा भक्त

महिपती तुम्हांपासी । चरणसेवा मागत ॥ ५ ॥

संस्कृत श्लोक

REF

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top