छत्रपती शिवाजी महाराज आणि कविराज भूषण संस्कृत श्लोक(Chhatrapati Shivaji Maharaj) Sanskrit Shlok :
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!
Table of Contents
- इंद्र जिमी जंभ पर । बाडव सुअम्भ पर । (छंद)
- अश्याच प्रकारची दुसरी एक कविता आहे.
- छंद 1
- छंद 2
- किल्ले रायगडचे वर्णन.
- सुरतेच्या हल्ल्याचे वर्णन.
साधारण ५-६ वर्षापूर्वी रायगडला आमच्या ग्रुप ने भेट दिली होती. त्या भेटीमध्ये कविराज भूषण यांचे छंद आणि त्यातील लय यांच्या प्रेमात पडलो.
परत आल्यावर भारत इतिहास संशोधक मंडळातील ग्रंथालयात ‘शिवाबावणी’ आणि ‘शिवराज भूषण’ चा शोध घेतला आणि बरेचसे छंद लिहून काढले.
१.) ही कविता सगळ्यांनाच माहिती असेल. टीवी मालिकेतील शीर्षक गीतामध्ये हा छंद वापरला होता.
इंद्र जिमी जंभ पर । बाडव सुअम्भ पर ।
रावण सदंभ पर । रघुकुलराज है ।।
पौन बारीबाह पर । संभू रतिनाह पर ।
ज्यों सहस्रबाह पर । राम द्विजराज है ।।
दावा द्रुमदंड पर । चीता मृगझुंड पर।
भूषन वितुंड पर । जैसे मृगराज है ।।
तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर।
त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है ।।
अर्थ: जसा इंद्र जम्भ्रासुरास, जसा वडवानल सागरास, जसा राम रावणास, जसा वायू मेघास, जसा शिव मदनास, जसा द्विजराज राम सह्स्रार्जुनास, जसा वणवा द्रुमांस, जसा चि
२.) अश्याच प्रकारची दुसरी एक कविता आहे.
सक्र जिमी सैल पर । अर्क तम फैल पर ।
बिघन कि रैल पर । लम्बोदर देखिये ।
राम दशकंध पर । भीम जरासंध पर ।
भूषण जो सिन्धु पर । कुम्भज बिसेखीये ।
हर जो अनंग पर । गरुड ज्यो भुजंग पर ।
कौरव के अन्ग पर । पार्थ जो पेखीये ।
बाज ज्यो बिहंग पर । सिंह ज्यो मतंग पर ।
म्लेंछ चतुरंग पर । शिवराज देखिये ।
३.) छंद 1
साजी चतुरंग वीर रंग में तुरंग चढी सर्जा शिवाजी जंग जीतन चलत है।
भूषण भनत नाद बीहद नगारन के नदी नद मद गैबरन के रलत है ।
ऐल फ़ैल खैल-भैल खलक में गैल गैल, गजन की ठैल फ़ैल सैल उसलत हैं।
तारा सो तरनि धुरी धारा में लगत जिमि थारा पर पारा पारावार यो हलत है ।
शिवाजी महाराजांच्या चतुरंग सेनेचे वर्णन यात आहे. या सेनेमध्ये हत्तीही आहेत ज्यांचे मद, ज्याप्रमाणे नदी वाहते, तसे वाहत आहे.
या हत्तींच्या चालण्याने पर्वतांचे आसनही डळमळीत झाले आहे. ही चतुरंग सेना जात असताना इतका धुरळा उडाला कि सुर्य पण एक छोटासा तारा भासू लागला, समुद्र हा थाळीत ठेवलेल्या पाऱ्याप्रमाणे हलू लागला आहे.
४.) छंद 2
प्रेतिनी पिशाचरू निशाचर निशाचरेहू, मिली मिली आपस मे गावत बधाई है।
भैरो भूत प्रेत भुरी भुदर भयंकरसी, जुत्थ जुत्थ जोगिणी जमाती जुरी आई है।
किलकी किलकी के कुतूहल करती काली, डीम डीम डमरू दिगंबर बजाई है।
सिवा पुंछे शिव सो, समाज आजू काहु चाले, काहु पे शिवनरेश भृकुटी चढाई है ।
राक्षस, भूत, भैरव हे सर्वजण आज खूपच आनंदी झाले आहेत. तेव्हा पार्वती महादेवाला विचारते कि हा सर्व समाज कुठे चालला आहे? आज शिवाजी महाराजांनी कुठे युद्ध छेडले आहे? ( जिथे भरपूर नरसंहार होऊन प्रेतांवर ताव मारायला मिळेल म्हणून हा समाज खूपच आनंदित झाला आहे. )
५.) किल्ले रायगडचे वर्णन.
जा पार सही तनै सिवराज सुरेस कि ऐसी सभा सुभ लाजे ।
जो कवी भूषण जंपत है लखी संपती को अलाकापती लाजे ।
जा मधी तीनहू लोक कि दिपती ऐसो बढो गढराय बिराजै ।
वारी पाताल सी माची मही अमरावती कि छबी उपर छाजै ।
रायगडची सभा हि देवसभेतुल्य आहे तर रायगडावरील संपती पाहून कुबेरही लाजेल. त्रिलोकातील सर्व कांती या गडामध्ये सामावलेली आहे (खंदक म्हणजे पाताळ, माची म्हणजे पृथ्वी आणि त्याच्यावर अमरावती)
६. id=”step1″) सुरतेच्या हल्ल्याचे वर्णन.
दिलीय दलन दबाई करी, सिव सर्जा निरसंक
लुटी लियो सुरत शहर बंकक्करी अति डंक
बंकक्करी अति डंकक्करी संकक्कुली खल
सोचच्चकित भरोचच्चलिय विमोचच्चखजल
तठ्ठठ्ठइमन कठ्ठठ्ठीक सोई रठ्ठठ्ठील्लिय
सद्दद्दिसि दिसी भद्दद्दीबीभई रद्दद्दील्लिय।
(वरील कवितेतील सगळे शब्द हे अर्थपूर्ण आहेत. जेव्हा हि कविता मी वाचली होती तेव्हा यातील शब्दांचा अर्थही मी लक्षात ठेवला होता पण कालांतराने तो विसरून गेला. पण हे काव्य म्हणताना जी लय आहे ती सुरतेच्या हल्ल्याइतकीच वेगवान आहे. शब्दांचा अर्थ जरी माहिती नसला तरी हि कविता म्हणताना आपण स्वतःच त्या युद्धाचे वर्णन करत आहोत असा फील येतो. याच अंगाने जाणारी साल्हेरीच्या युद्धाची पण कविता आहे पण ते पुन्हा केव्हातरी.)
Pingback: Sanskrit Shlok- बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक ४-९) – शंभू राजे Sanskrit Shlok - संस्कृत श्लोक