Sanskrit Shlok-बुधभूषण संस्कृत श्लोक अध्याय १ (श्लोक ४) – शंभू राजे

अध्याय १

श्लोक क्र १

देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदर्पितनागम् ।

भक्तविघ्नहनने धृतरयत्नं तं नमामि भवबालकरत्नं नमामि ।।

अर्थ-आपल्या हिन्दु धर्मामध्ये कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ श्रीगणेशाचे आणि कुलदेवतेचे पूजन करूनच केला जातो. धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराजांनी देखील याच प्रथेला अनुसरून आपल्या “बुधभूषण” या राजनीती विषयक ग्रंथाची सुरुवात श्रीगणपती आणि श्रीनरसिंह या देवतांना नमन करून केलेली आहे.

श्रीगणेशाला वंदन करताना संभाजी महाराज म्हणतात “ज्यांची स्तुती देव आणि दानव (राक्षस) हे दोघेही करतात, ज्यांनी मदोन्मत्त हत्तीला अगदी सहज शांत केले, जे भक्तांची विघ्ने नष्ट करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात, अशा भगवान शंकरांचे पराक्रमी पुत्र असणाऱ्या गणपतीला मी वंदन करतो.”

श्लोक क्र २

शशांकमौलिं भसितेन भासुरं पंचाननं शैलसुताधिनाथम्।

त्र्यक्षम् गिरीशं दशबाहुमंडितं कुबेरमित्रं सततं नमामि ।।

अर्थ ज्यांच्या मस्तकावर चंद्र आहे, शरीराला भस्म लावल्यामुळे जे पांढरे शुभ्र दिसतात, ज्यांना पाच मुखे आहेत, जे हिमालयाची कन्या पार्वती हिचे पती आहेत, ज्यांना तीन नेत्र आहेत, जे पर्वतांचे स्वामी आहेत, ज्यांनी दशदिशा व्यापल्या आहेत आणि जे कुबेराचे मित्र आहेत अशा भगवान श्रीशंकरांना मी (धर्मवीर श्रीशंभूछत्रपती) नेहमी वंदन करतो.

आपल्या ग्रंथाची सुरुवात करताना शंभूराजांनी गणपती आणि शंकर या देवतांना वंदन केले आहे. यावरून संभाजी महाराज हे परम ईश्वरनिष्ठ होते हे सहज ध्यानात येते.

अध्याय १

श्लोक क्र ३


विरिंचीविष्णुवंदितं नगाधिराजकन्यका-

विभूषितार्धविग्रहं प्रभूतबंदिसंस्तुतम्।


लसज्जटातटस्फुरत्सुरापगाविनिःसर-

द्विशुद्धवारिशीतलं नमामि चंद्रशेखरम् ।।


या श्लोकात सुद्धा शंभूराजांनी भगवान महादेव यांची स्तुती केलेली आहे.
ब्रह्मदेव आणि विष्णू हे देखील भगवान शंकरांना वंदन करतात. महादेवांच्या शरीराचा अर्धा भाग हा हिमालयकन्या माता पार्वती यांनी विभूषित केलेला आहे (म्हणूनच महादेवांना अर्धनारीनटेश्वर म्हणतात). अशा भगवान शंकराची स्तुती अनेक भाट-चारण करतात, त्यांच्या जटांमधून भागीरथी गंगा नदी वाहते. या गंगेचे शुद्ध जल त्यांच्या शरीरावरुन वाहत असल्याने त्यांचे शरीर शीतल झालेले असते. अशा त्या चंद्रमौळी (भाळी चंद्र धारण करणाऱ्या) शंकरांना मी (संभाजी महाराज) भक्तीने वंदन करतो.

श्लोक क्र ४


अज्ञानकृष्णसर्पण दंशिता भुवि मानवः ।

तेषां जीवनहेत्वर्थम् नौमि जांगुलिकं गुरुम् ।।


हिन्दु संस्कृतीमध्ये गुरुला ईश्वराचे स्थान देण्यात आलेले आहे.

म्हणूनच या ग्रंथाच्या आरंभी संभाजी महाराजांनी श्रीशंकरांच्या रूपातील सद्‌गुरूंना वंदन केले आहे.
अज्ञानरुपी काळ्या सापाने या भूतलावरील ज्या मानवांना दंश केला आहे, जे ज्ञानचक्षूच्या अभावाने ज्ञानांध झालेले आहेत, त्यांना ज्ञानाच्या रूपाने नवे जीवन प्राप्त व्हावे म्हणून समग्र जगताचे गुरु असणाऱ्या श्रीशंकरांना मी वंदन करतो (वास्तविक जांगुलिक म्हणजे गारुडी अथवा सर्पगुरु. गारुडी जसे सापांना वश करतो तसेच भगवान शंकर हे या अज्ञानरुपी सर्पाना नियंत्रणात ठेवतात असा भावार्थ अभिप्रेत आहे.)

LIFE INSURANCE (LIC) Investment , Advantages And Disadvantages 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top