पसायदान : Pasaydan in Marathi

।। पसायदान ।।
आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ।।१।।
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ।।२।।
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ।।३।।
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भुता ।।४।।
चला कल्पतरुंचे अरव । चेतना चिंतामणीचे गाव ।
बोलते जे अर्णव । पीयुषाचे ।।५।।
चंद्रमें जे अलांछन । मार्तंड ज तापहीन ।
ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ।।६।।
किंबहुना सर्व सुखी । पुर्ण होऊनि तिहीलोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित ।।७।।
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकी इये । दृष्टादृष्ट विजये । होआव जी ।।८।।
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरांवो । हा होईल दानपसावो ।
येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया जाहला ।।९।।