Hi Anadi Bharatbhu | ही अनादि भरत भू
“ही अनादि भरतभू ही अनादि संस्कृति ”
ही अनादि भरतभू, ही अनादि संस्कृति
रोज अरुण चंद्रमा आरतीस उगवती ॥ ध्रु॥
धरुनि अभय सावली, मायभूमिच्या शिरीं
हा युगें युगें उभा अचलराज हिमगिरी
चराण अर्घ्य द्यावया सिंधुलहरी उसळती ॥ १॥
शब्द स्वप्निही दिला, तरिहि तो ठरो खरा
म्हणुनि राव रंक हो ही इथे परंपरा
पितृवचन पाळण्या विजनवासी रघुपती ॥२॥
धर्मराज तो तया, भीम पार्थ वंदिती
देव सूत होऊनी कर्मयोग सांगती
ज्ञानियामुखें इथें बोलतें सरस्वती ॥३॥
याच भूवरी जिजा, शिवनृपास वाढवी
श्रीसमर्थवैखरी राष्ट्रधर्म जागवी
निती नांदते इथे सिद्ध शक्ति संगती ॥४॥
॥ पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ॥
॥ धर्मवीर छत्त्रपती संभाजी महाराज की जय ॥
॥ भारतमाता की जय ॥
॥ हिंदु धर्म की जय ॥