DURGA MATA DAUD SHLOK | श्री दुर्गामाता दौडीचे श्लोक
श्री दुर्गामाता दौडीचे श्लोक
अंधारातही सर्व पाहू शकती, ऐसे आम्हा नेत्र दे |
अग्नीला ही बसेल स्पर्श करिता, चटका असे चित्त दे ||
निद्रा भूक तहान सर्व ईशणा, गिळण्या मनी शक्ती दे |
अंबे दे शिवसुर्यसदृश्य उरी, भक्ती कृती धैर्य दे ||
अंबे दे शिवपुत्त्रसदृश्य उरी, भक्ती कृती धैर्य दे ||
नभासारीखे चित्त देई विशाल |
तसे जान्हवी सारीखे शुद्ध शील ||
रवी सारीखी बुद्धी तेजस्वी देई |
प्रभू मागणे अन्य ते काही नाही ||
आई मागणे धन्य ते काही नाही ||
व्याकुळ चित्त अमुचे, तव दर्शनार्थ |
आशिष देई जननी, बनण्या कृतार्थ ||
झुंजार राष्ट्र करण्या, अवघ्या जगात |
जगदंब वास कर तु, आमच्या उरात ||
आतुर धावत आलो, तो दर्शनाला |
शिवबा समान मती हृद, द्युती दे आम्हाला ||
शिवतेज ठासून भरू, जनशोणीतात |
करू हिंदुराष्ट्र बलदंड, उभ्या जगात ||
आम्हा एक देवा, नको अन्य काही |
कृपाछत्त्र राहो, तुझे नित्य डोई ||
हृदी भक्ती देई, तनी कर्म शक्ती |
आणि अंतरामाजी, आत्म प्रचिती ||
अति उंच उंच मन दे, दुर्गा आम्हाला |
रवीच्या समान द्युती दे, आमुच्या मतीला ||
अति वेगवान पद दे, पथ धावण्याला |
हिंदवी स्वराज्य करण्या “शिवकाळीजाला” ||
गगनाहुनीही मन उंच विशाल व्हाया |
गंगेहुनीही मन शुद्ध पवित्न व्हाया ||
रवीचंद्रवत मन ज्वलंत प्रसन्न व्हाया |
राष्ट्रार्थ आशिष असो तव मुळमाया ||
(मुळमाया – तुळजाभवानी)
शिवसिंहवत हृदयी देई स्वराष्ट्रनिष्ठा |
शिवपुत्त्रवत प्रखर देई स्वधर्मनिष्ठा |
तृष्णा क्षुधा जननी दे, रिपुच्या वधाची |
वरदान दे पुरव आस, आम्हा उरांची ||
शत्रु असंख्य उठले, अति नीच क्रूर |
शिवबा कधी न खचले, करण्या प्रहार ||
ते धैर्य, साहस, लढाऊ, चढाऊ बाणा |
दे अंबे (आई) खड्ग वधण्या, यवनाधमांना ||
होत्या अनंत आपदा, जरी भोवताली |
संभाजी धर्म जगले, रणी धैर्यशाली ||
संदेह भीती कधी ना, शिवली मनाला |
जगदंब आशिष तसा, तव दे आम्हाला ||
हृदयात वास कर तु तुळजाभवानी |
द्यावास आशिष आम्हा आठही करांनी ||
इच्छा यशस्वी करण्या श्री शिवभुपतींच्या |
सेना खड्या आम्ही करू शिवसैनीकांच्या ||
सेना खड्या आम्ही करू शिवपाईकांच्या ||