बलसागर भारत होवो | Balsagar Bharat Hovo
बलसागर भारत होवो । विश्वात शोभूनी राहो ।। धृ ।।
हे कंकण करी बांधियले । जनसेवे जीवन दिधले ।
राष्ट्रार्थ प्राण हे उरले । मी सिध्द मरायाला हो ।।१।।
वैभवी देश चढवीन । सर्वस्व त्यास अर्पीन ।
तिमिर घोरं संहारिन । या बंधु सहाय्याला हो ।।२ ।।
हातात हात घेऊन । हृदयास हृदय जोडून ।
ऐक्याचा मंत्र जपून । या कार्य करायाला हो ।।३।।
करि दिव्य पतांका घेऊ । प्रिय भारत गीते गाऊ ।
विश्वास पराक्रम दावू । ही माय नियपदा लाहो ।।४।।
या उठा करु हो शर्थ । संपादु दिव्य पुरुषार्थ ।
हे जीवन ना तरि व्यर्थ । भाग्यसूर्य तळपत राहो ।।५ ।।
ही माय थोर होईल । वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल । तो सोन्याचा दिन येवो ।।६ ।।