श्रीरामाची आरती अर्थासह | Aarti of Shri Ram

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी

लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।  

कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी

देह अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥

Aarti of Shri Ram

जय देव जय देव निजबोधा रामा

परमार्थे आरती, सद्भावे आरती,

परिपूर्णकामा ॥धृ०॥

Aarti of Shri RamAarti of Shri RamAarti of Shri RamAarti of Shri RamAarti of Shri Ram

प्रथम सीताशोधा हनुमंत गेला

लंका दहन करुनी अखया मारिला

मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला

आनंदाची गुढी घेऊनिया आला ॥ २ ॥

Aarti of Shri RamAarti of Shri RamAarti of Shri RamAarti of Shri RamAarti of Shri RamAarti of Shri Ram

निजबळे निजशक्ति सोडविली सीता।

म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा

आनंदे ओसंडे वैराग्य भरता

आरती घेऊनी आली कौसल्यामाता ॥ ३ ॥

Aarti of Shri Ram Aarti of Shri Ram Aarti of Shri Ram Aarti of Shri Ram Aarti of Shri Ram

अनाहतध्वनि गर्जती अपार

अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार

अयोध्येसी आले दशरथकुमार

नगरीं होत आहे आनंद थोर ॥ ४ ॥

Aarti of Shri RamAarti of Shri Ram

सहजसिंहासनी राजा रघुवीर

सोऽहंभावे तया पूजा उपचार

सहजांची आरती वाद्यांचा गजर

माधवदास स्वामी आठव ना विसर ॥ ५ ॥

संत माधवदास

पाठभेद : काही ठिकाणी श्रीरामाच्या आरतीत प्रथम पुढील कडवे व नंतर उर्वरित कडवी म्हटली जातात.

स्वस्वरूपोन्मुखबुद्धि वैदेही नेली

देहात्मकाभिमाने दशग्रीवे हरिली

शब्दरूप मारुतीने सच्छुद्धि आणिली

तव चरणांबुजी येऊन वार्ता श्रृत केली

जय देव जय देव निजबोधा रामा

आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ

 ‘जय देव जय देव निजबोधा रामा’ या ध्रुपदातील ‘निजबोधा रामा’ म्हणजे ‘आत्मबोधरूप आत्मारामा’.

 ‘मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला’ यामधील ‘भुवनी त्राहाटिला’ म्हणजे हनुमानाने आकाशात भ्रमण करून स्वतःच केलेला शत्रूचा विध्वंस पाहिला.

 ‘अनाहतध्वनि गर्जती अपार ।’ याचा भावार्थ आहे, श्रीरामाच्या विजयाप्रीत्यर्थ मेघनाद, तसेच घंटा, शंख, भेरी इत्यादी वाद्यांचा अपार नाद होऊ लागला. मेघनादासारखा नाद स्वर्गस्थ देवतांकडून होत असल्याने त्याला ‘अनाहतध्वनी’ असे म्हटले आहे.

‘अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।’ यातील ‘अठरा पद्मे’ म्हणजे १८० लक्ष कोटी. Aarti of Shri Ram

‘सहजांची आरती वाद्यांचा गजर ।’ याचा अर्थ सहजावस्थेत असणार्‍या वसिष्ठादी मुनींनी प्रभु श्रीरामचंद्रांची आरती केली आणि मंगलवाद्यांचा गजर केला, असा आहे.

‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्रीरामचरणी प्रार्थना.

Sukanya Samriddhi Yojana(SSY)​सुकन्या समृद्धी योजना (SSY)/(SSA) -2024

Sanskrit Shlok श्रीमद्भगवद्गीता संस्कृत श्लोक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top