Jai Bhavani Jai Shivray | जय भवानी । जय शिवराय
जय भवानी। जय शिवराय ।
जय भवानी। जय शिवराय ॥ धृ ॥
तूं रक्षियले देशाला ।
न्याय नीती आदर्शाला ॥
तूं जागविले धर्माला ।
जय भवानी जय शिवराय ॥१॥
तूं प्रेरक नवतरुणांचा ।
तूं प्रतिक चारित्याचा ॥
राष्ट्रपुरुष या देशाचा ।
जय भवानी जय शिवराय ॥२॥
दुष्ट आक्रमक लोळविले ।
सज्जनास तू वाचविले ॥
राज्य हिंदवी स्थापियले ।
जय भवानी जय शिवराय ॥३॥
महापराक्रमी तूंच खरा ।
राजनीती चाणक्य खरा त्यागाचा आदर्श खरा ।
जय भवानी जय शिवराय ॥४॥
जात पात तुज मान्य नसे।
प्रांतभेद तुज ठाव नसे ॥
हिन्दु धर्म सर्वत्र असे।
जय भवानी जय शिवराय ॥५॥
देशाच्या एकत्वाचे।
ध्येयपूर्तता करण्याचे ॥
राज्य हिन्दवी मोलाचे जय।
भवानी जय शिवराय ॥६॥
शिवरायांचा जयजयकार ।
जिजाऊंचा जयजयकार ॥
भारतभूचा जयजयकार ।
भगव्या ध्वजाचा जयजयकार ॥
जय भवानी जय शिवराय ॥ ७॥