शिरडी के साईं बाबा आरती | Shirdi ke Sai Baba Aarti

जय देव जय देव जय साईनाथा ।। श्री सद्गुरुनाथा ।। विश्वंभरा विश्वेशा । तारक तू जगता ।। धृ ।।Sai Baba


ब्रह्माण्डाचा नायक देवा तू कळले ।प्रत्यय निजभक्तांचे अद्भुत दावियेले ।।
Sai Baba


ब्रह्मा विष्णु शङ्कर गणपती तू त्राता ।भजतां तव पदकमला हरिसी भवचिंता ॥ १ ॥
Sai Baba


हरूनि दारिद्रयाते रंका रक्षियलेरोगग्रस्तां तुझिया उदिनें तारियले ।।
Sai Baba


वांझेसी तोषविलें देऊनिया पुत्रा जो जो वांछिल त्यांचा तू अससी दाता ॥ २॥
Sai Baba


ज्ञानरवी तू दिधले ज्ञान अज्ञाना सन्मार्गा लावुनिया उद्धरिले त्यांना ।।
Sai Baba


ऐशी तू सकलांची ममताळू माता ।रोमांचित तनु होई गुण महिमा गातां ।। ३ ।।
Sai Baba


यमपाशा तोडुनी तू भक्त सोडविले ।आयुर्बल देऊनि त्या सकला तोषविले ।।
Sai Baba


ऐसे सामर्थ्याचे प्रताप तव गातांशिणली मति मग आलो शरण तुला नाथा ॥ ४॥
Sai Baba


मद्वचनी विश्वासुनि जे सेवा करितीत्यांची चिंता लागे रात्रंदिन मजसी ।।
Sai Baba


ऐसे दृढ आश्वासन दिधलेसी जगता ।करुणेचा सागर तू अससी गुरुनाथा ॥ ५॥
Sai Baba Sai Baba


समतेची योगाची मूर्ती श्री साई । ऋद्धिसिद्धी घेती लोळण तव पायी ।।
Sai Baba


अंतर साक्षी तुजला सर्वाची वार्ता ।अगम्य तुजला कांहीं ऐसा तू जाता ॥ ६॥
Sai Baba


लाभे फळ करितां तव नवस समाधीला । दाखविसी अद्यापी निज साद लीला ||
Sai Baba


चुकतां पथ दर्शविसी देउनि दृष्टांता । हीना दीनांचा तू स्वामी हितकर्ता ।।७।।
Sai Baba


जन्मोजन्मी मजला घडुं दे श्रीदेवा । आशीर्वचनाची तव लाभो मज सेवा ।।
Sai Baba


घालुनिया लोटांगण याचितसे नाथा । पापात्मा मी यास्तव लोटुं नका परता ।। ८ ।।
Sai Baba

REF

साई बाबा आरती समाप्त .

Shri ganesh shlok | श्री गणेश श्लोक 5

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top